---Advertisement---

IND vs NZ; मुंबईच्या मैदानावर जयस्वालच्या नावावर होणार ‘हा’ धमाकेदार रेकाॅर्ड?

---Advertisement---

सध्या भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील दोन्ही कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा धुव्वा उडवत मालिकेत 2-0 अशी आघाडी मिळवली. आता तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा युवा स्टार खेळाडू यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) इतिहास रचू शकतो.

भारताचा युवा सलामीवीर फलंदाज जयस्वालने पुणे कसोटीत चमकदार कामगिरी केली होती. त्याने दुसऱ्या डावात 65 चेंडूत 77 धावांची खेळी केली. दरम्यान त्याने 3 षटकार ठोकले. एका वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत जयस्वाल दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 2024 मध्ये 31 षटकार मारले आहेत. आता मुंबई कसोटी दरम्यान तो इतिहास रचू शकतो.

एका वर्षात कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये जयस्वाल सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. यामध्ये न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम आघाडीवर आहे. त्याने 2014 मध्ये 9 सामन्यांमध्ये 33 षटकार मारले होते. जयस्वालने मुंबई कसोटीत 3 षटकार मारले तर तो मॅक्युलमला मागे टाकेल.

कसोटी क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार-

ब्रँडन मॅक्युलम (न्यूझीलंड)- 33 षटकार (2014)
यशस्वी जयस्वाल (भारत)- 31 षटकार (2024)
बेन स्टोक्स (इंग्लंड)- 26 षटकार (2022)

भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील तिसरा कसोटी सामना (1 ते 5 नोव्हेंबर) दरम्यान वानखेडेवर खेळला जाणार आहे. पहिल्या 2 सामन्यांबद्दल बोलायचे झाले, तर न्यूझीलंडने बेंगळुरूच्या मैदानावर पहिला कसोटी सामना 8 विकेट्सने जिंकला. त्यानंतर पुण्याच्या मैदानावर 113 धावांनी सामना जिंकला. न्यूझीलंड संघाला पहिल्यांदाच भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकण्यात यश आले.

महत्त्वाच्या बातम्या-

“त्याच्यावर शंका घेणे अयोग्य”, रोहित शर्माच्या समर्थनार्थ आला सर्वात जवळचा मित्र
सलग पराभवानंतर टीम इंडियात होणार मोठे बदल! हे 3 खेळाडू होऊ शकतात तिसऱ्या कसोटीतून बाहेर
केएल राहुलला नारळ! लखनऊ सुपर जायंट्सनं रिटेन केले हे 5 खेळाडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---