माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने 2023 या वर्षातील एकदिवसीय संघाची निवड केली असून यापैकी निम्म्याहून अधिक खेळाडूंची निवड त्यांनी भारतातून केली आहे. आकाश चोप्राने आपल्या संघात एकूण सहा भारतीय खेळाडूंची निवड केली आहे. त्याने रोहित शर्मा याला या संघाचा कर्णधार बनवले आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक जिंकला आणि 2023 विश्वचषकाची अंतिम फेरीही गाठली.
आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांची सलामीवीर म्हणून निवड केली आहे. तो म्हणाला की, रोहित शर्माने या वर्षी एकूण 1255 धावा केल्या असून, दोन शतके आणि 9 अर्धशतके झळकावली आहेत. या काळात त्याची सरासरी 52 आणि स्ट्राइक रेट 117 होता. शुभमन गिलनेही पाच शतके आणि 9 अर्धशतकांसह एकूण 1584 धावा केल्या. त्याची सरासरी 63 होती.
त्याने विराट कोहली (Virat Kohli) याला आपल्या संघात तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आहे. 2023 मध्ये कोहलीने सहा शतके झळकावताना 1377 धावा केल्या. विशेष बाब म्हणजे या वर्षी त्याने सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा वनडेमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला आणि आपल्या कारकिर्दीतील 50 वे वनडे शतक झळकावले. आकाश चोप्राने चौथ्या क्रमांकावर न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेल (Darrell Mitchell) याची निवड केली असून पाचव्या क्रमांकावर पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याला स्थान दिले आहे. याशिवाय त्याने बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन (Shakib Al Hasan) याचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.
जर आपण गोलंदाजीबद्दल बोललो तर आकाश चोप्राने दक्षिण आफ्रिकेचे दोन दिग्गज गोलंदाज मार्को यानसेन (Marco Janssen) आणि जेराल्ड कोएत्झी (Gerald Coetzee) यांची निवड केली आहे. याशिवाय दुसरा फिरकीपटू म्हणून कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याची निवड करण्यात आली आहे. विश्वचषकामध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या मोहम्मद शमी (Mohammad Shami) याचीही त्यानी निवड केली आहे. याशिवाय मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) यालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. आकाश चोप्राने शाहीन आफ्रिदी, ऍडम झाम्पा, केएल राहुल आणि रचिन रवींद्र यांना राखीव खेळाडू म्हणून ठेवले आहे. (Major cricket team picks best ODI Team of 2023 Ya ranks Indian players)
आकाश चोप्राने निवडलेला 2023 वर्षातील सर्वोत्तम वनडे संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, डॅरेल मिचेल, मोहम्मद रिझवान, शाकीब अल हसन, मार्को यानसेन, जेराल्ड कोएत्झी, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
हेही वाचा
AUS vs PAK: आयपीएलच्या सर्वात महागड्या खेळाडूने आपले वचन पाळले, मेलबर्न कसोटीनंतर छोट्या चाहत्याला दिले शूज भेट; पाहा व्हिडिओ
भारताच्या पराभवानंतर हरभजन सिंगचे पुजाराबाबत मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘त्याचे विराट एवढेच…’