---Advertisement---

मोहम्मद आमिर इंग्लंडला जाण्याच्या लायकीचा नाही

---Advertisement---

पाकिस्तान संघ ३ कसोटी आणि ३ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. पाकिस्तान संघाचे अधिकतर खेळाडू जून महिन्यातच इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाले होते. त्यावेळी पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने इंग्लंड दौऱ्यावरून आपले नाव परत घेतले होते. कारण त्याच्या पत्नीला मूल होणार होते.

आमिर दुसऱ्यांदा बाप झाला आहे. आणि याबरोबरच पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही (Pakistan Cricket Board) त्याला इंग्लंड दौऱ्यावर पाठविले आहे. परंतु पाकिस्तान संघाचा माजी गोलंदाज आकिब जावेद (Aaqib Javed) यावर नाखुश आहे.

जावेदचा असा विश्वास आहे की, डावखुरा वेगवान गोलंदाज आमिर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तान संघाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळविण्याच्या लायकीचा नव्हता. मुलीचा जन्म लवकर झाल्यामुळे तो मोकळा झाला होता. आणि अशामध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्या कोविड-१९ च्या चाचण्या केल्या. त्यानंतर त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी पाठविण्यात आले.

परंतु जावेद म्हणतो की, २८ वर्षीय आमिरला इंग्लंडला पाठविणे हा बोर्डाचा चुकीचा निर्णय आहे. कारण तो केवळ टी२० क्रिकेट खेळू शकतो. त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

आमिरच्या जागी वेगवान गोलंदाज जुनैद खानला (Junaid Khan) इंग्लंडला घेऊन जायला पाहिजे होते, असेही जावेद पुढे म्हणाला. पाकिस्तान क्रिकेटबद्दल बोलताना जावेद म्हणाला, “पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि निवड समिती आमिरचे चाहते आहेत. त्याला नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पसंत केले जाते. जर तुम्ही जुनैदच्या कामगिरीची तुलना आमिरशी केली, तर जुनैदही मागे नाही. खरंतर तो उत्कृष्ट खेळाडू आहे.”

“जुनैदबरोबर अन्याय केला आहे. आणि त्याला कोणत्याही कारणाशिवाय दुर्लक्ष केले गेले आहे. पीसीबी स्पॉट फिक्सिंग घटनेनंतर आमिरला पुन्हा संघात घेऊन आले आणि तेव्हापासून त्याने केवळ २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात एकदा उल्लेखनीय कामगिरी केली होती. याव्यतिरिक्त आमिर नेहमीच आपल्या पुनरागमनानंतर संघर्ष करताना दिसला आहे. मला वाटते की तो आधी टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी जात आहे. कारण तो कसोटी खेळत नाही,” असेही जावेद पुढे म्हणाला.

“जेव्हा तुमच्याकडे इंग्लंडमध्ये असणाऱ्या २९ सदस्यांच्या संघात आधीपासूनच १० वेगवान गोलंदाज आहेत, तर तुम्हाला आमिरला फोन करण्याची आवश्यकता का आहे? भविष्याबाबत कोणतीही स्पष्टता नाही,” असेही तो पुढे म्हणाला.

महत्वाच्या बातम्या –

आयपीएल फ्रंचायझी आहेत स्पॉन्सर्सच्या शोधात, तब्बल ९५% इन्वेंट्रीची केलीय विक्री

-आयपीएलचे आयोजन यूएईत ३ ठिकाणी झाल्याने मॅच फिक्सिंगला बसेल आळा, पहा काय आहेत सुविधा

-युएईत होणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये हे ४ संघ करु शकतात प्लेऑफमध्ये प्रवेश

ट्रेंडिंग लेख –

-आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा अधिक धावा करणारे ५ फलंदाज

-आयपीएल २०२० मध्ये पदार्पण करु शकतात हे ५ परदेशी खेळाडू; एकाने तर ठोकलेत एका षटकात ५ षटकार

-२५०पेक्षा जास्त वनडे सामने खेळूनही या ५ खेळाडूंवर कर्णधारपद…

-आख्ख्या कसोटी करियरमध्ये एकही षटकार फलंदाजाला मारु न देणारे महारथी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---