ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६६ धावांनी विजय मिळवला. या विजयात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचचा मोठा वाटा होता. त्याने या सामन्यात शतकी खेळी केली होती. मात्र यानंतरही तो सोशल मीडियावर आरसीबी चाहत्यांकडून ट्रोल झाला आहे.
झाले असे की फिंचने या सामन्यात १२४ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ११४ धावा केल्या. या खेळीतून त्याने तो फॉर्ममध्ये परतल्याची ग्वाही दिली. मात्र या सामन्याआधी फिंच आयपीएल २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळला होता. मात्र या आयपीएलमध्ये त्याला खास काही कामगिरी करता आली नाही. त्याने १ अर्धशतकासह १२ सामन्यात केवळ २६८ धावा केल्या होत्या.
त्यामुळे सध्या आरसीबी चाहते त्याला ट्रोल करत आहेत की तो आयपीएलमध्ये प्लॉप राहिला मात्र ऑस्ट्रेलियाकडून दमदार कामगिरी करत आहे.
Finch for Finch for RCB
Aus pic.twitter.com/rCC4dHKUVT— Aakash Chopra (@cricketaakash) November 27, 2020
#RCB fans asking if there are two players called Aaron Finch!
— Harsha Bhogle (@bhogleharsha) November 27, 2020
Aaron finch while playing for
RCB Aussies pic.twitter.com/HeNcq23RPa
— వేటగాడు (@rao_4005) November 27, 2020
Aaron Finch for Aaron Finch for
RCB vs Aussie 🇦🇺 #INDvsAUS #ODI2020 pic.twitter.com/W4VAAtjVX8— Sairam Chowdary🧡 (@Sairam_57) November 27, 2020
Finch with RCB . Finch with AUS pic.twitter.com/eZ0O2lKfC7
— मनी_sh 🕉 (@ManishK0701) November 27, 2020
https://twitter.com/AsimSquad_Aman/status/1332220978722529280
#INDvAUS
1) Finch while playing for RCB.
2) Finch while playing for Australia. pic.twitter.com/SjnRowzmCJ— Meme_waali_didi (@meme_waali_didi) November 27, 2020
https://twitter.com/An_shusher22/status/1332244031502393344
After seeing Finch today.
Rcb Management: pic.twitter.com/v6ThM6f8CM
— RISHI (@Always_Rcbian) November 27, 2020
शुक्रवारी झालेल्या सामन्यात फिंचने डेविड वॉर्नरबरोबर पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी केली होती. तसेच फिंच व्यतिरिक्त या सामन्यात स्टिव्ह स्मिथनेही १०५ धावांची शतकी खेळी केली. स्मिथ आणि फिंचमध्येही दुसऱ्या विकेटसाठी १०८ धावांची शतकी भागीदारी झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद ३७४ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रतिउत्तरादाखल भारताला ५० षटकात ३०८ धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
…तर तुम्हाला देशाबाहेर काढू! न्यूझीलंडने दिली पाकिस्तानी संघाला ‘लास्ट वॉर्निंग’
अटीतटीच्या झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा वेस्ट इंडिजवर विजय
विराटची साडेसाती संपेना! सिडनीच्या मैदानावर पुन्हा अपयशी