---Advertisement---

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाची एबीला थेट कर्णधारपदाची ऑफर?? एबी म्हणतो…

---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्सने मे २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. परंतु आता पुन्हा त्याच्या पुनरागमनाबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत. माध्यमांमध्ये अशा चर्चा येत आहेत की, त्याला दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते.

खरंतर माध्यमातील काही वृत्तानुसार, डिविलियर्सला क्रिकेट दक्षिण आफ्रिका बोर्डाने (Cricket South Africa) कर्णधारपदाची ऑफर दिली होती. पण डिविलियर्सने मात्र अशी कोणतीही ऑफर त्याला आली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

डिविलियर्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंंटवरून ट्वीट केला की, “काही माध्यमांतील वृत्तांनुसार, मला संघाचा कर्णधारपदाची ऑफर देण्यात आली होती. परंतु हे सर्व चूकीचे आहे. सध्या कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवला पाहिजे हेच समजणे कठीण होत आहे.”

३६ वर्षीय डिविलियर्सने दिलेल्या माहितीवरून स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमामध्ये सांगिण्यात आले की, डिविलियर्सला (AB De Villiers) क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने पुन्हा संघाचे नेतृत्व करण्याबद्दल विचारले होते. ११४ कसोटी, २२८ वनडे आणि ७८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारा डिविलियर्स म्हणाला की, “मी तेव्हाच पुनरागमन करेल, जेव्हा मला वाटेल की मी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी योग्य आहे. सध्या मी फ्रंचायझी क्रिकेट खेळत असतो.”

“माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, मी माझ्या अव्वल फॉर्ममध्ये आले पाहिले. तसेच माझ्याबरोबर जे खेळाडू आहेत त्यांच्यापेक्षा मला चांगले असायला पाहिजे. जर मला वाटले की, मी संघात स्थान मिळवण्यास पात्र आहे, तर हे माझ्यासाठी सहज होईल. कारण यामुळे मला असे वाटेल की, मी अंतिम अकरा जणांमध्ये सामील झाले पाहिजे,” असेही डिविलियर्स पुढे म्हणाला.

डिविलियर्स पुढे म्हणाला की, “मी इतक्या वर्षांपासून दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाचा भाग नाही. तसेच मला असे वाटते की, ही माझ्या आणि इतर लोकांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे की, सध्याही मी इतके चांगले खेळतो की त्यामुळे मी संघात स्थान मिळवू शकेल.”

दक्षिण आफ्रिका संघाचे प्रशिक्षक मार्क बाऊचर (Mark Boucher) यांनी सुरुवातीला म्हटले होते की, ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकासाटी (T20 World Cup) राष्ट्रीय संघात डिविलियर्सच्या नावाचा तेव्हाच विचार केला जाईल, जेव्हा तो चांगल्या फॉर्ममध्ये असेल. तसेच स्थान मिळवायचे असेल तर त्याला स्वत:ला सर्वोत्तम सिद्ध केले पाहिजे.

परंतु कोरोना व्हायरसला पहाता डिविलियर्स म्हणाला की, “जर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी२० विश्वचषक स्थगित झाला, तर मी संघात पुनरागमन करण्याची खात्री नाही.”

ट्रेंडिंग लेख –

-आयसीसी क्रमवारीत टीम इंडियाला मोठा फटका, पहिल्या स्थानावरुन थेट…

-५ अशी कारणं ज्यामुळे रोहितला केलं पाहिजे टीम इंडियाचा कर्णधार

-एकदा नाही, दोनदा नाही तर या ५ वेळा रोहितने गोलंदाजांना धु धु धुतले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---