पुणे: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-पीएमडीटीए एआयटीए 18वर्षाखालील चॅम्पियनशीप सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात अभिराम निलाखे, ईशान दिगंबर यांनी तर, मुलींच्या गटात सिद्धी खोत, श्रावणी देशमुख या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात अभिराम निलाखेने पंधराव्या मानांकित आर्यन घाडगेचा 7-5, 6-2 असा तर, अथर्व बिराजदारने आदित्य तलाठीचा 6-4,4-6,6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. ईशान दिगंबर याने सातव्या मानांकित चन्नामल्लिका यलेचा 6-2, 6-3 असा पराभव केला.
मुलींच्या गटात सहाव्या मानांकित सिद्धी खोतने चौथ्या मानांकित निशिता देसाईचा 6-3, 1-6, 6-3 असा पराभव केला. पाचव्या मानांकित प्रिशा शिंदेने अनन्या देशमुखचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. श्रावणी देशमुख हिने रितिका कापलेचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून मुख्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले:
आश्विन नरसिंघानी वि.वि.अर्जुन किर्तने 6-3, 6-3;
पियुश जाधव वि.वि.आर्यन हूड 6-3, 6-3;
सिद्धार्थ मराठे [12] वि.वि.विश्वजीत सणस6-3, 6-2;
अथर्व बिराजदार वि.वि.आदित्य तलाठी 6-4,4-6,6-4;
अभिराम निलाखे वि.वि.आर्यन घाडगे[15] 7-5, 6-2;
मिहीर कांतावाला वि.वि.ओम पाटील 6-3, 6-2;
ईशान दिगंबर वि.वि.चन्नामल्लिका यले [7] 6-2, 6-3;
सौमिल चोपडे[8]वि.वि.अनुश घनबहादूर 6-3, 6-1;
मुली:
सेजल भुतडा[1] वि.वि.श्रेया पठारे 6-3, 6-4;
ग्रेटा अनिल[2]वि.वि.यग्मसेनी चक्रवर्ती [8] 6-1, 6-0;
हर्षरी आशेर [3]वि.वि.श्रेया होनकन 6-4, 6-0;
आर्या शिंदे वि.वि.काव्या देशमुख 7-5, 6-0;
सिद्धी खोत[6]वि.वि.निशिता देसाई [4] 6-3, 1-6, 6-3;
वैष्णवी चौहान वि.वि.कनिका बाबर 6-2, 5-7, 6-0;
प्रिशा शिंदे [5] वि.वि.अनन्या देशमुख 6-0, 6-0;
श्रावणी देशमुख वि.वि.रितिका कापले 6-2, 6-3.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ये हुई ना बात! ‘मराठमोळ्या’ ऋतुराजने सचिनच्या होम ग्राउंडवरच मोडला त्याचा ‘स्पेशल’ विक्रम
बॅटवर स्टिकर लावण्याचे क्रिकेटर्सला किती पैसे मिळतात? जाणून घ्या भारताच्या स्टार खेळाडूंबद्दल
तीन युवा भारतीय खेळाडू, ज्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत मिळू शकते संधी