भारताचा महान फिरकीपटू हरभजन सिंगने आपल्या कारकीर्दीत अनेक विक्रम केले आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाला विजयाच्या शिखरावर पोहचवण्यात मोलाचे योगदान दिले आहे. हरभजन सिंगने आपल्या गोलंदाजीने अनेक फलंदाजाना तंबूत परत पाठवले होते. नुकतीय हरभजनने भारताच्या सध्याच्या फिरकीपटूंसंदर्भात आणि अगामी टी२० विश्वचषकाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हरभजनच्या मतानुसार, टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारताला चांगली कामगिरी करायची असेल, तर फिरकीपटूंना संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि राहुल चाहर टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत. त्याचबरोबर हरभजन सिंगला वाटते की, ‘मिस्ट्री स्पिनर’ वरुण चक्रवर्ती संघात असावा.
चक्रवर्तीने आयपीएलच्या मागील हंगामात प्रभावी कामगिरी केली होती आणि ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी भारतीय संघात स्थानही मिळवले होते. परंतु, दुखापतीमुळे तो या दौऱ्यावर जाऊ शकला नाही. फिटनेसच्या मुद्द्यांमुळे इंग्लंड विरुद्धच्या घरच्या मैदानांवरील मालिकेतही त्याला संघात संधी मिळू शकली नाही. परंतु, त्याने अलीकडेच श्रीलंकेविरूद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आता हरभजनला वाटते की टी २० विश्वचषक संघात स्थान मिळवायला तो पात्र आहे.
हरभजन सिंग स्पोर्ट्स तकला सांगितले की, “मला वाटते की तो टी २० विश्वचषकात असावा, कारण त्याच्यात सर्व प्रकारचे गुण आहेत. तो विकेट घेऊ शकतो, धावा रोखू शकतो, पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करू शकतो आणि अखेरच्या षटकांतही तो गोलंदाजी करू शकतो. त्याच्यामध्ये एकमेव कमतरता आहे, ती म्हणजे तो खूप चिंताग्रस्त असतो. मी केकेआर संघात असताना त्याच्याबरोबर थोडा वेळ घालवला. त्याला स्वत: ला त्याची क्षमतेबद्दल पूर्ण माहित नाही. ”
हरभजन सिंग पुढे म्हणाला की, जेव्हा त्याने चक्रवर्तीला पहिल्यांदा एमएस धोनी विरुद्ध गोलंदाजी करताना पाहिले होते. तेव्हा त्याला माहित होते की, तो एक दिवस भारतीय संघासाठी खेळणार आहे. हरभजन सिंगच्या मते, गेल्या वर्षीच्या आयपीएलच्या सराव सत्रादरम्यान धोनी सर्व गोलंदाजांच्या चेंडूवर लांब लांब शॉट मारत होता. तेव्हा तो चक्रवर्ती होता, जो धोनीला त्रास देत होता. चक्रवर्तीला जितकी जास्त संधी मिळेल, तितकाच तो भविष्यात चांगला गोलंदाज होईल.
हरभजन सिंग म्हणाला की, “मी त्याला चेन्नई सुपर किंग्जबरोबर नेट सत्रात प्रथमच पाहिले होते. महेंद्रसिंग धोनी उर्वरित वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांना षटकार मारत होता. परंतु, जेव्हा चक्रवर्ती गोलंदाजी करीत होता, तेव्हा त्याने धोनीला सर्व प्रकारचा त्रास दिला आहे. त्याचबरोबर त्याने खूप वेळा त्याला बाद देखील केले आहे. तसेच त्याच्या चेंडूवर कोणीच शॉट मारू शकला नाही. तेव्हाच मला समजले होते की, एक दिवस नक्की हा भारताकडून खेळेल. त्याच्याकडे थोडी नर्वस ऊर्जा आहे, परंतु जितके तो खेळेल, तितकीच तो चांगली कामगिरी करू शकेल.”
वरूण चक्रवर्तीने २५ जुलै रोजी श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेतील तिन्ही सामने खेळताना २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
इंग्लंड दौऱ्यात ‘हा’ गोलंदाज भारतासाठी ठरेल हुकमी एक्का, डेल स्टेनचा दावा
मोठ्या मनाचा माणूस! देशासाठी ‘अशी’ मोठी मदत करत जिंकली मनं