---Advertisement---

मैदानावर शिवी देणं ‘या’ ऑसी क्रिकेटरला पडलं महागात, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ठोठावला २५०० डॉलर्सचा दंड

On: गुरूवार, डिसेंबर 31, 2020 4:52 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे खेळाडू सामन्यादरम्यान मैदानावर स्लेजिंग करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. कधी-कधी तर त्यांचा राग इतका अनावर होतो की, त्यांना स्वत:मधील सभ्यतेचा विसर पडतो. असे काहीसे ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झम्पा याच्यासोबत घडले आहे. ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या बिग बॅश लीगच्या २०२०मधील एका सामन्यादरम्यान त्याने मैदानावर अपशब्द वापरले. ज्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

१६व्या षटकात राग झाला अनावर

झाले असे की, सिडनी थंडर्स संघाचा डाव चालू होता. झम्पा डावातील १६वे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील एका चेंडूवर विरुद्ध सिडनी थंडर्सच्या कॅलम फर्ग्युसनने साधारण शॉट मारला आणि एक धाव घेण्यासाठी पळाला. तेवढ्यात मेलबर्न स्टार्स संघातील एका खेळाडूच्या हातून त्याचा चेंडू सुटला आणि चौकार गेला. त्यामुळे झम्पाला राग अनावर झाला आणि त्याने रागात मैदानावर आपल्याच सहकाऱ्याला शिवी दिली.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली माहिती

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याविषयी माहिती देत सांगितले की, “ऍडम झम्पा याने मेलबर्न स्टार्स विरुद्ध सिडनी थंडर्स संघात २९ डिसेंबर रोजी झालेल्या सामन्यात अपशब्द वापरले होते, जे स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झाले आहेत. त्यानंतर झम्पाने त्याची चुक स्विकारली. त्यामुळे त्याच्यावर एका सामन्याचे प्रतिबंध लावण्यात आले आहेत. तसेच २५०० डॉलर्सचा दंडही आकारण्यात आला आहे. त्यामुळे तो २ जानेवारी रोजी होबार्ट हेरिकेन्सविरुद्ध होणाऱ्या सामन्याचा भाग नसेल.”

या २८ वर्षीय लेग-स्पिनरने बिग बॅश लीगच्या दहाव्या हंगामापर्यंत आतापर्यंत ७ विकेट्स घेतल्या आहेत. तो या हंगामात मेलबर्न स्टार्सकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“टीम इंडियात स्टोक्सची भूमिका साकारतोय जडेजा”, माजी भारतीय दिग्गजाने थोपटली पाठ 

साल २०१३ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या खेळाडूची ७ वर्षांनी निवृत्तीची घोषणा

कोरोना काळात गोलंदाजांसाठी ‘ही’ गोष्ट सर्वात कठीण, मार्क बाऊचरने मांडले मत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---