भारतीय क्रिकेट संघाच्या कीटवर ब्रँडच्या नावाच्या प्रायोजकत्वासाठी भारताच्या २ मोठ्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. आदिदास आणि पुमा यांना आपल्या ब्रँडचे नाव भारतीय संघाच्या कीटवर लावायचे आहे. अधिक फायदेशीर करार करण्यासाठी बीसीसीआय दोन्ही कंपन्यांशी चर्चा करत आहे.
येत्या सप्टेंबर महिन्यात नाईकीचा बीसीसीआयसोबतचा करार संपणार आहे. बीसीसीआय आणि नाईकीमध्ये हा करार मागील १४ वर्षांपासून होता. आता बीसीसीआयला कीट प्रायोजकत्वासाठी नवीन जोडीदार शोधत आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्था आयएएनएसला सांगितले की, आदिदास आणि पुमाने भारतीय संघाच्या कीट प्रायोजकत्वासाठी रस दाखविला आहे. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता असेल. जो काही करार केले जातील ते भारतीय क्रिकेटच्या हिताचे असतील.
असे देखील म्हटले आहे की, नाईकीसोबतचा करार २०१६ मध्ये वाढविण्यात आला होता. त्यावेळी ही कंपनी प्रत्येक सामन्यासाठी ८७.८४ रुपये देण्यास तयार झाली होती. कोरोना व्हायरसमुळे खराब झालेली मार्केट परिस्थिती पाहता नाईकी आता करार वाढविण्यात रस दाखवत नाही. अशामध्ये बीसीसीआय समोर आदिदास आणि पुमा यांसारख्या कंपन्या कीट प्रायोजकत्वासाठी पुढे आल्या आहेत.
अधिकाऱ्याने म्हटले की, “करार संपल्यानंतर बीसीसीआय निविदा प्रक्रिया सुरु करेल. यादरम्यान जर नाईकला आधीच्या दराने कराराचा कालावधी वाढवायचा असेल, तर बीसीसीआय त्यावर विचार करू शकते.”
महत्त्वाच्या बातम्या-
-कर्णधार झालेला हा क्रिकेटर करतोय आयपीएलची जोरदार तयारी, रोहित-विराटच्या टीमला करणार चितपट
-या क्रिकेटरला प्रत्येक सामन्यात संधी द्या, शेन वॉर्नने केली या क्रिकेटरसाठी जोरदार गोलंदाजी
ट्रेंडिंग लेख-
-इंग्लंडमधील काऊंटीच्या फॉर्मच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवणारा संकटमोचक क्रिकेटर
-हैराण करणारा विक्रम! आयपीएलमध्ये ४८ चेंडू खेळून एकही चौकार मारु न शकलेले क्रिकेटर
-बीसीसीआयच्या दबावामुळे ‘हे’ ५ भारतीय क्रिकेटर लवकरच करणार क्रिकेटला टाटा बाय बाय