भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने (bcci) अनुभवी फलंदाज रोहित शर्मा (rohit sharma) याला भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार बनवले आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेत पराभव मिळाल्यानंतर विराट कोहलीने कसोटी संघाचे नेतृत्व सोडले आणि आता रोहितवर ही जबाबदारी आली आहे. कसोटी कर्णधार बनल्यानंतर रोहित शर्माचे एक जुने ट्वीट व्हायरल होत आहे.
कसोटी संघाचा कर्णधार बनण्यापूर्वी रोहित शर्मा भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा देखील कर्णधार बनला होता. रोहित शर्मा आता क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघांचे नेतृत्व करणार आहे. मैदानावर तो जितका सक्रिय असतो, तेवढाच सोशल मीडियावर देखील असतो. त्याला सरावातून वेळ मिळताच तो चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असतो. आता कसोटी कर्णधार बनल्यानंतर त्याचे २०१८ मधील असेच एक ट्वीट पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. ट्वीटमध्ये त्याने लिहिले आहे की, “मला लांडग्यांमध्ये टाकण्यात आले आणि मी त्याच कळपाचे नेतृत्व करू लागलो.”
Throw me to the wolves and I come back leading the pack
— Rohit Sharma (@ImRo45) September 1, 2018
मागच्या वर्षी टी२० विश्वचषकानंतर विराटने टी२० संघाचे नेतृत्व सोडले आणि रोहितवर ही जबाबदारी आली. त्यापूर्वी रोहितने संघाचे नेतृत्व करताना एशिया चषक जिंकवून दिला होता. त्याने आतापर्यंत एकूण २४ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे त्यापैकी २० सामने संघाने जिंकले आहेत.