---Advertisement---

हृदयविकाराच्या झटक्यातून सावरल्यानंतर कपिल देव यांनी शेअर केला भावनिक व्हिडिओ, म्हणाले…

On: शुक्रवार, नोव्हेंबर 13, 2020 6:18 PM
---Advertisement---

भारताचे पहिले विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांना मागील महिन्यात हृदयविकाराचा झटका येऊन गेला. त्यावेळी त्यांच्यावर अँजिओप्लास्टीही करण्यात आली. पण आता ते यातून सावरले असून त्यांनी नुकताच एक भावनिक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.

गोल्फ खेळायला सुरुवात –

तसेच याआधी गुरुवारी (१२ नोव्हेंबर) ६१ वर्षीय कपिल देव यांनी अँजिओप्लास्टी झाल्यानंतर पुन्हा एकदा गोल्फ खेळयला सुरुवात केल्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता. कपिल देव आवड म्हणून बऱ्याचदा गोल्फ खेळतात. विशेष म्हणजे त्यांनी अनेकदा विविध गोल्फ स्पर्धांमध्ये सहभागही घेतला आहे. नुकतेच ते दिल्ली गोल्फ क्लबमध्ये खेळताना दिसले होते.

त्यांनी गोल्फ खेळतानाच्या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की ‘गोल्फ कोर्स किंवा क्रिकेट मैदानावर पुनरागमन करणे किती मजेदार आहे, हे शब्दात व्यक्त करु शकत नाही. गोल्फ कोर्सवर परत आलोय, मित्रांसह मस्ती करणे आणि खेळणे, हे सर्व खूप मस्त आहे. हेच आयुष्य आहे.’

मागील महिन्यात आला होता हृदय विकाराचा झटका –

कपिल देव यांना मागील महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. यानंतर त्यांनी दूरदर्शनवर क्रिकेट विश्लेषक म्हणूनही आपले काम पुन्हा सुरु केले होते.

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने लॉर्ड्स मैदानावर पहिल्यांदा सन १९८३ साली विश्वचषक जिंकला होता.

महत्त्वाच्या बातम्या –

-कपिल देव यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज; माजी भारतीय क्रिकेटरने शेअर केला फोटो

टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल, खेळाडूंना विशेष सुविधा, विराट कोहलीसाठी खास पेंटहाउस

हातात चहाचा कप, डोळ्यावर गॉगल… राज ठाकरेंचा टेनिस कोर्टातील रुबाबदार फोटो व्हायरल

ट्रेंडिंग लेख –

-क्रिकेटमधील खरेखुरे ‘जंटलम‌ॅन’, ‘त्या’ एका कृतीने ‘कपिल देव’ जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले

-शशी कपूर यांना लॉर्ड्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी कपिल देव यांनी केली अशी आयडिया…

-वाढदिवस विशेष: १९८३ विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास १० गोष्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---