जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला 8 विकेट पराभूत केले. या अंतिम सामन्यानंतर आता ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात भारतीय संघाला इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. अंतिम सामन्यानंतर इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी सुरू होण्यामध्ये सहा आठवड्यांचा भारतीय संघाला वेळ मिळाला आहे. हा वेळेदरम्यान 20 दिवस भारतीय संघाला सुट्टीचा आनंद आणि आपला थकवा दूर करण्यासाठी दिले आहे.
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाण्याअगोदर बीसीसीआयने संघातील खेळाडूंना आपल्या सोबत कुटुंबीयांना घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे खेळाडूंबरोबर सध्या इंग्लंडमध्ये त्यांचे कुटुंबिय देखील आहेत. त्याचबरोबर सर्वजण बायोबबलमध्ये खूप दिवसांपासून राहत आहेत. त्यामुळे खेळाडूंना मानसिक ताण येण्याची शंका आहे. त्याचमुळे खेळाडूंना सुट्टी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे विराट कोहली, रोहित शर्मा, मयंक अगरवाल, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा आपापल्या कुटुंबासमवेत फिरताना दिसून येत आहेत.
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनी इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये रहाणेची पत्नी राधिका आणि मुलगी आर्या दिसत आहेत. तसेच त्यांच्यासोबत रोहित शर्माचे कुटुंबही आहे.
https://www.instagram.com/p/CQqd35yBh14/
https://www.instagram.com/p/CQlvZbbBBk5/
तसेच मयंक अगरवालने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याची पत्नी अशिता आहे. तसेच त्यांच्याबरोब इशांत शर्मा आणि त्याची पत्नी प्रतिमा दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CQqfYScL8JG/
त्याचबरोबर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली देखील कॉफीशॉपमध्ये पत्नी अनुष्का शर्मा सोबत वेळ घालवताना दिसून आला आहे.
https://www.instagram.com/p/CQqfn0jKVD6/
भारतीय संघातील सर्व खेळाडू 14 जुलैला एकत्रित येण्यास सांगण्यात आले आहे. 4 ऑगस्टपासून नॉटिंघममधील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.
अंतिम सामनामध्ये पावसाने आणला व्यत्यय
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 जून ते 23 जून दरम्यान खेळला गेला. या ऐतिहासिक सामन्यामध्ये पावसाने व्यत्यय आणला होता. पहिल्या आणि चौथ्या दिवशी एकही चेंडू न टाकता खेळ रद्द झाला होता. या अंतिम सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवसाची तरतूद केली होती. त्यामुळे 23 जूनला हा सामना राखीव दिवशी खेळवण्यात आला. या अंतिम सामन्याचा निकाल शेवटच्या दिवशी म्हणजेच राखीव दिवशी लागला.
भारतीय संघाने दुसऱ्या डावात न्यूझीलंडला राखीव दिवशी 139 धावांचे लक्ष्य दिले होते. न्यूझीलंड संघाने 46 षटकात सहज हे लक्ष्य गाठले. न्यूझीलंड संघाने आठ विकेटने भारतावर विजय मिळवला आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या विजेतेपदाची मानाची गदा उचलली. या सामन्यामध्ये अष्टपैलू काईल जेमिसनला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘पुढच्यावेळी तुझ्याशिवाय फोटो काढणार नाही’, सूर्यकुमारने ‘तशी’ कमेंट करताच कर्णधार शिखर धवनचे उत्तर
भारीच! टीम इंडियाचा धुरंधर शुबमन गिलला WTC फायनलसाठी मिळाला खास सन्मान; आयसीसीने दिली माहिती
विम्बल्डनला आली सचिन-विराटची आठवण, शेअर केला व्हिडिओ