पुणे (22 मार्च 2024) – आजच्या दिवसाचा चौथा सामना अहमदनगर विरुद्ध सांगली यांच्यात झाला. अहमदनगर संघाने प्रमोशन फेरीत 3 सामने जिंकले होते तर सांगली ने 3 पैकी 2 सामने जिंकले होते. सामन्याची सुरुवात अत्यंत चुरशीची झालेली. त्यानंतर मात्र अहमदनगर संघाने आक्रमक खेळ करत 10 व्या मिनीटला सांगली संघाला ऑल आऊट करत 13-10-अशी आघाडी मिळवली. त्यानंतर प्रफुल झवारे व आशिष यादव ने चतुरस्त्र चढाया करत गुण मिळवले.
मध्यंतरापुर्वी अहमदनगर संघाने पुन्हा एकदा सांगली संघाला ऑल आऊट करत सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. सांगली कडून अभिषेक गुंगे व अभिराज पवार गुण मिळवत होते मात्र त्याना बचावफळीची साथ मिळत नव्हती.मध्यंतराला अहमदनगर संघाने 26-15 अशी आघाडी मिळवली होती. मध्यंतरा नंतरही अहमदनगरच्या चढाईपटूंनी आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड मजबूत केली.
सांगली कडून अभिराज पवार ने सुपर टेन पूर्ण करत एकाकी झुंज दिली मात्र अहमदनगरच्या अनुभवा पुढे सांगली संघाचा टिकाव लागला नाही. अहमदनगर संघाने 60-35 असा सामना जिंकला. अहमदनगर संघाकडून आशिष यादव ने चढाईत एकूण 16 गुण मिळवले. तर प्रफुल झवारे ने चढाईत 15 गुण मिळवत संघचा विजय सुकर केला. सोमनाथ बेडके ने पकडीत एकूण 5 गुण मिळवले. सांगली कडून अभिषेक गुंगे ने एकाकी झुंज दिली. (प्रमोशन फेरीत अहमदनगर संघाचा विजयी चौकार)
बेस्ट रेडर- अभिषेक गुंगे, सांगली
बेस्ट डिफेंडर- सोमनाथ बेडके, अहमदनगर
कबड्डी का कमाल- आशिष यादव व प्रफुल झवारे, अहमदनगर
महत्वाच्या बातम्या –
प्रमोशन फेरीत पालघर संघाचा तिसरा विजय, तर मुंबई शहराचा चौथा पराभव
प्रमोशन फेरीत कोल्हापूर संघाचा विजयाचा चौकार