कालपासून(22 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. सर विवियन रिचर्ड्स स्टेडीयमवर सुरु असलेल्या या सामन्यासाठी भारताच्या 11 जणांच्या संघात फिरकी गोलंदाज आर अश्विनला संधी न मिळल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
पण त्याला संघात संधी न देण्यामागील कारण भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्पष्ट केले आहे.
रहाणे म्हणाला, ‘अश्विनसारख्या खेळाडूला बाहेर ठेवणे कठिण आहे. पण संघ व्यवस्थापन नेहमीच संघात सर्वोत्तम मिश्रण राहिल याचा विचार करतात.’
‘त्यांनी विचार केला की रविंद्र जडेजा या खेळपट्टीवर योग्य पर्याय आहे. कारण आम्हाला सहावा फलंदाज पाहिजे होता, जो गोलंदाजीही करेल. हनुमा विहारी या खेळपट्टीवर गोलंदाजीही करु शकतो. हीच चर्चा कर्णधार आणि प्रशिक्षकांमध्ये झाली.’
तसेच रहाणे म्हणाला, ‘अश्विन, रोहित शर्मासारख्या खेळाडूंना बाहेर बसवणे हे अवघड आहे. पण हे सर्व संघासाठी आहे.’
या सामन्यासाठी अश्विनला 11 जणांच्या संघात संधी न दिल्याने आश्चर्य वाटल्याचे म्हणत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्करांनीही टीका केली होती.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात पहिल्या दिवसाखेर 6 बाद 203 धावा केल्या आहेत. भारताकडून रहाणेने 81 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच केएल राहुलने 44 धावांची छोटेखानी महत्त्वपूर्ण खेळी केली. पहिल्या दिवसाखेर रिषभ पंत 20 धावांवर तर रविंद्र जडेजा 3 धावांवर नाबाद खेळत आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–फिल्डिंग कोच म्हणून निवड न झाल्यानंतर जॉन्टी ऱ्होर्ड्सने दिली ही प्रतिक्रिया
–शास्त्रींना टक्कर देणारा उमेदवार आता कोहलीच्या आरसीबीची धूरा सांभाळणार
–व्हिडिओ:…म्हणून जॉन्टी ऱ्होड्सची झाली नाही फिल्डींग कोचसाठी निवड, प्रसाद यांचा खूलासा