भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याच्यासाठी मागील दोन महिने अत्यंत शानदार राहिले आहेत. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघासाठी दमदार कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय संघात पुनरागमनची संधी मिळाली. त्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात देखील तो भारतासाठी सर्वोत्तम फलंदाज ठरला. त्यानंतर त्याच्याकडे आता कसोटी संघाचे नेतृत्व देण्याच्या बातम्या समोर येत आहेत. असे असताना आता इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ सुरुवातीला तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. या मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली यांना विश्रांती देण्याची शक्यता आहे. अशात रहाणे संघाचा कर्णधार होऊ शकतो. त्याचवेळी या दौऱ्यानंतर तो थेट इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी पोहोचेल. त्याने लिसेस्टरशायर काउंटी संघासह करार केला असून, त्यांच्यासाठी तो प्रथमश्रेणी सामने तसेच लिस्ट एक सामने खेळेल. रहाणे यापूर्वी हॅम्पशायर काउंटी संघासाठी क्रिकेट खेळलेला आहे.
रहाणे यावर्षी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसला होता. चेन्नई सुपर किंग्स संघासाठी खेळताना त्याने आपले योगदान दिले. त्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची देखील त्याला संधी मिळाली. तब्बल दीड वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करत असताना त्याने पहिल्या डावात 89 तर दुसऱ्या डावात 46 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघात नियमित सदस्य होऊ शकतो, असे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी म्हटले आहे.
(Ajinkya Rahane Signed With Leicestershire County Cricket Club He Joins After West Indies Tour)
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघात होणार मोठा बदल? रोहितच्या जागी ‘हा’ पठ्ठ्या बनू शकतो कर्णधार
रणजीत 7 सामन्यात 50 विकेट्स, तरीही दुलीप ट्रॉफीत मिळाली नाही संंधी; गोलंदाज म्हणाला, ‘भारतात…’