जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याला बुधवार (7 जून) पासून सुरुवात झाली आहे. ओव्हलवर सुरू झालेला, हा सामना कोणं जिंकत याकडे सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या आहेत. भारतीय संघातील दमदार खेळाडू अजिंक्य रहाणे आणि अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर यांनी संघासाठी चमकदार खेळी खेळली आहे. मराठमोळ्या खेळाडूंनी खेळपट्टीवर आपली वेगळी छाप सोडली. याचे कारण म्हणजे खेळपट्टीवर असताना एकमेकांना प्रोत्साहन देत दोघेही मराठीमध्ये संवाद साधत होते. तुम्ही पाहिला का व्हिडीओ?
खरं तर, तिसर्या दिवशी आशेची किरण दिसला तो, अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांच्या भागीदारी मध्ये. ऑस्ट्रेलियाने (Australia) पहिल्या डावात केलेल्या 469 धावांच्या प्रत्युत्तरात भारताच्या पहिल्या डावात 296 धावा केल्या. या सामन्यातील तीन दिवसांच्या खेळाबाबत बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येचा पाठलाग करताना अजिंक्य आणि ठाकुरने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाखेर 4 बाद 123 अशी मजल मारत आपली आघाडी 296 पर्यंत नेली.
इंग्रजी भुमीत वाजला मराठीचा डंका
दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाखेर शार्दुल आणि अजिंक्यने आपल्या खेळीतून सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले. ओव्हलच्या खेळपट्टीवर दोघेही फलंदाज आपला जम बसवताना दिसून आले. यावेळी, रहाणे शार्दुलला मराठी मधून सूचना देत होता. तो म्हणाला की, “खेळत रहा खेळत रहा शाब्बास, एक बॉल एक बॉल, एक एक बॉलचा विचार कर फक्त, चांगल आहे हा खेळत रहा.” त्यावर शार्दुल रहाणेला म्हणतो, “पॉइंट मागे केला हा.” दोघांनी आपल्या खेळीने चाहत्यांची मने जिंकलीच पण ओव्हलच्या मैदानावर मराठी मध्ये बोलल्यानंतर चाहत्यांनी इंटरनेटवर एकच धुमाकुळ घातला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
साता समुद्रापार माय मराठीचा डंका!#WTCFinal2023 मध्ये @ajinkyarahane88 आणि @imShard यांचा मराठीतून संवाद pic.twitter.com/gWgWTIfwWO
— Mahesh Waghmare (@MaheshMGW23) June 10, 2023
शार्दुलचे ओव्हलवर सलग तिसरे अर्धशकत
शार्दुल त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर ओव्हलचा लॉर्ड बनला यात शंका नाही. या मैदानावर त्याने सलग तिसऱ्या डावात अर्धशतक झळकावले. मागच्या वेळी जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता तेव्हाही शार्दुलने आश्चर्यकारक कामगिरी केली होती. 2021 मध्ये त्याने दोन्ही डावात अर्धशतके झळकावली होती. तसेच, जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यामध्येही (World Test Championship Final) त्याने अर्धशतक पुर्ण करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 109 चेंडूत 51 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.
रहाणे 13व्या कसोटी शतकाच्या जवळ मात्र,
कसोटी क्रिकेटमध्ये 5000 हजारांहून अधिक धावा करणारा रहाणे भारतीय संघाचा 13वा फलंदाज आहे. रहाणे आपल्या 13व्या कसोटी शतकाच्या अगदी जवळ होता. तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकनंतर रहाणेच्या बॅटमधून आणखी 11 धावा निघाल्या असत्या तर तो खास कामगिरी आपल्या नावावर करू शकला असता. मात्र, त्याने आपल्या संघासाठी 72.95 च्या स्ट्राईक रेटने 122 चेंडूत 89 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 11 चौकार आणि एक उत्कृष्ट षटकार सुद्धा पहायला मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
अर्रर्र! नव्वदच्या स्पीडने धावा काढत होता रहाणे, पण कॅमरून ग्रीन बनला स्पीडब्रेकर; पकडला अविश्वसनीय कॅच
मागच्या 10 वर्षांपासून टीम इंडिया का जिंकत नाहीये आयसीसी ट्रॉफी? हरभजन सिंगने स्पष्टच सांगितलं