क्रिकेटर होण्यासाठी एक खेळाडू आपल्या लहानपणापासूनच तयारीला लागतो. क्रिकेटमधील सरावाच्या दरम्यानच खेळाडू निश्वचित करतो की तो फलंदाज, गोलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडू यांपैकी त्याला काय बनायचे आहे. खेळाडू आपल्या आवडीनुसार सराव करतो. एखाद्याला फलंदाज बनायचे असेल तर तो फलंदाजीचा सराव करतो आणि गोलंदाज बनू इच्छिणारा खेळाडू गोलंदाजीचा सराव करतो. पण आम्ही तुम्हाला अशा दोन भारतीय खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांना फलंदाज बनायचे होते, पण गोलंदाज बनले.
1- रविचंद्रन अश्विन
भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची कहाणी खूपच रंजक आहे. अश्विन हा टीम इंडियाचा स्टार स्पिनर आहे, पण त्याला कधीच गोलंदाज बनायचे नव्हते. याचा खुलासा खुद्द अश्विनने केला आहे. अश्विनने सांगितले होते की, मला फलंदाज बनायचे आहे. एवढेच नाही तर अश्विन 17 वर्षांखालील संघात सलामीवीर म्हणूनही खेळला आहे आणि त्याने खूप धावाही केल्या आहेत. या काळात त्याने एका सामन्यात 7 विकेट्सही घेतल्या. तेव्हा प्रशिक्षकाने अश्विनला सांगितले की, तू चांगला गोलंदाज बनू शकतोस. फलंदाज बनू पाहणाऱ्या अश्विनने इथून हळूहळू गोलंदाज बनायला सुरुवात केली. मग शेवटी तो दिग्गज गोलंदाज म्हणून उदयास आला.
2- अजित आगरकर
भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज आणि सध्याचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनाही फलंदाज व्हायचे होते. आगरकरने स्वतःच खुलासा केला होता की, मला गोलंदाज नाही तर फलंदाज व्हायचे आहे. आगरकर शालेय क्रिकेटमध्ये खूप धावा करत असे. एकेकाळी आगरकरला मुंबईचा पुढचा सचिनही म्हटले जायचे. आगरकरचे फलंदाज बनण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नसले तरी तो एक महान वेगवान गोलंदाज म्हणून उदयास आला.
अजित आगरकरने आपल्या करिअरमध्ये 26 कसोटी, 119 वनडे आणि 4 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीच्या 46 डावात 58 विकेट घेतल्या. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यांच्या 188 डावात 288 विकेट्स आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 3 डावात 3 विकेट घेतल्या आहेत.
महत्तवाच्या बातम्या-
RCBला चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूचा आज वाढदिवस…! भारतासाठीही ठोकल्या 7000+ धावा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमराह हा किर्तीमान रचणाच्या उंबरठ्यावर, श्रीलंका दाैऱ्यासाठी मिळणार संधी?
आगामी श्रीलंकेदाैऱ्यापूर्वी केएल राहुल चर्चेत! मुंबईमध्ये खरेदी केले चक्क इतक्या किमतीचे घर