---Advertisement---

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी माजी क्रिकेटरने निवडली भारताची अंतिम एकादश, भुवीसह ‘या’ खेळाडूंना नारळ

On: शनिवार, ऑक्टोबर 23, 2021 1:33 PM
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चे बिगुल वाजले असून रविवार रोजी (२४ ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात बहुप्रतिक्षित लढत रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता दुबईच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. त्यामुळे उभय संघ या सामन्यासाठी तगड्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानावर उतरतील.

तत्पूर्वी बऱ्याचशा क्रिकेट पंडितांनी आणि आजी-माजी क्रिकेटपटूंनी या सामन्यासाठी बळकट प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. अशात माजी भारतीय वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांनीही भारतीय संघाची अंतिम एकादश निवडली आहे.

आगरकरांनी निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीच्या स्थानासाठी प्रबळ दावेदार अससेल्या ईशान किशन याला स्थान दिलेले नाही. तसेच अष्टपैलू हार्दिक पंड्या यालाही निवडलेले नाही. याव्यतिरिक्त अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, फिरकीपटू आर अश्विन यांनाही संघाबाहेर ठेवले आहे.

आगकरांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामी जोडी म्हणून रोहित शर्मा आणि जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुल यांना जागा मिळाली आहे. सलामी जोडीनंतर कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीचा भार सांभाळेल. तर वरची फळी बाद झाल्यानंतर संघाला मजबूत स्थितीत आणण्याचे काम सूर्यकुमार यादव करेल. परंतु आयपीएल २०२१ च्या युएई टप्प्यात या फलंदाजाची बॅट म्हणावी तितकी चाललेली नाही. तरीही आगकरांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.

त्यानंतर पाचव्या क्रमांकावर विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला जागा दिली आहे. अष्टपैलू रविंद्र जडेजाआणि शार्दुल ठाकूर पुढे खालच्या मधल्या फळीचा भाग असतील. जडेजाला फिरकी अष्टपैलू आणि शार्दुलला वेगवान गोलंदाजी अष्टपैलू म्हणून निवडले आहे. तसेच आगरकरांनी गोलंदाजी विभागात मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती आणि राहुल चाहर यांची नियुक्ती केली आहे. तर वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतले आहे.

पाकिस्तानविरुद्ध आगकरांनी निवडलेली भारताची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलच्या मेगा लिलावबद्दल मोठी अपडेट; इतके खेळाडू करता येऊ शकतात रिटेन

भारत असे सामने जिंकूनच शांत बसतो; पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी बीसीसीआय अध्यक्षाची ‘गर्जना’

भारताच्या मुख्य प्रशिक्षकाच्या प्रकरणात ‘नवा ट्विस्ट’, द्रविडने ऑफर न स्विकारल्याचा गांगुलीकडून खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---