आयपीएल 2020 चा हंगाम आता संपला आहे. मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटलचा 5 गडी राखून पराभव केला. आयपीएल 2020 संपल्यानंतर भारताचा माजी खेळाडू अजित आगरकरने त्याचे 11 खेळाडू निवडले आहेत. त्याने आयपीएल 2020 च्या निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये केएल राहुल, विराट कोहली आणि रोहित शर्माचा समावेश केलेला नाही.
दिल्लीचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर यांना सलामीवीर फलंदाजीची जबाबदारी अजित आगरकरने दिली आहे. धवनने या स्पर्धेत 2 दिमाखदार शतके ठोकली, तर दुसरीकडे वॉर्नरने या हंगामात हैदराबादकडून अनेक मोठ्या खेळी केल्या.
मुंबई इंडियन्सचा फलंदाज इशान किशनची तिसऱ्या क्रमांकावर निवड झाली आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवला चौथे स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा यष्टिरक्षक फलंदाज एबी डिविलियर्सची निवड पाचव्या क्रमांकावर केली आहे. मुंबई इंडियन्सचा फलंदाज हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर मार्कस स्टॉयनिसला सातव्या क्रमांकावर अष्टपैलू म्हणून स्थान देण्यात आले आहे.
अजित आगरकरने या प्लेइंग इलेव्हनमध्ये दिल्लीचा कागिसो रबाडा आणि मुंबईकडून जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांनाही स्थान दिले आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीनेही अजित आगरकरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळविले आहे. त्याचबरोबर बेंगलोरचा मुख्य फिरकीपटू युझवेंद्र चहल यालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.
अजित आगरकरने निवडलेला प्लेइंग इलेव्हन संघ-
डेविड वॉर्नर, शिखर धवन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, एबी डिविलियर्स, हार्दिक पांड्या, मार्कस स्टॉयनिस, कागिसो रबाडा, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची झाली कोरोना टेस्ट; पाहा काय आलेत खेळाडूंचे रिपोर्ट
आयपीएल जिंकल्यानंतर रोहित शर्मा बनला ‘या’ कंपनीचा ब्रॅंड एंबेसेडर; देणार शैक्षणिक क्षेत्रात योगदान
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात ‘तो’ भारताचा महान गोलंदाज बनेल, ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर