टी२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातील टी२० आणि कसोटी मालिका खेळणार आहे. न्याझीलंडविरुद्ध टी२० मालिका खेळण्यासाठी भारतीय संघातील खेळाडू निश्चित केले गेले आहेत. यामध्ये वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. फिरकी गोलंदाज राहुल चाहरला संघातून वगळले गेले आहे. अशात भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी निवडप्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
राहुलला संघातून वगळल्यानंतर आकाश चोप्रांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते फक्त एका सामन्याच्या आधारावर हा निर्णय घ्यायला नको होता.
न्यूझीलंडविरुद्ध टी२० आणि कसोटी मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे आणि वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती मिळाली आहे. यामध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजा यांना विश्रांती मिळाली आहे. तर वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल, आवेश खान या नवीन खेळाडूंना पहिल्यांदाच संघासाठी खेळण्याची संधी मिळणार आहे.
तसेच युजवेंद्र चहल, ऋतुराज गायकवाड आणि मोहम्मद सिराज या मालिकेतून संघात पुनरागमन करणार आहेत. विराटने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता रोहित शर्मा टी२० संघाचा कर्णधार असणार आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या अपेक्षित कामगिरी न करू शकल्यामुळे त्याला संघातून वगळले गेले आहे.
राहुल चहरला संघातून वगळणे चुकीचे – आकाश चोप्रा
राहुल चाहरला या मालिकेत खेळण्याची संधी दिली गेली नसल्यामुळे आकाश चोप्रा यांनी नाराजी व्यक्ते केली आहे. त्यांनी भारतीय संघाच्या निवडप्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आकाश यांच्या मते राहुलला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी पूर्ण संधी मिळाली नाही.
त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना ते म्हणाले की, “राहुल चाहरने टुर्नामेंटमध्ये केवळ एक सामना खेळला आहे आणि फक्त याच्याच आधारावर तुम्ही त्याला कसकाय वगळले ? तुम्ही कसाकाय हा विचार करू शकता की आता तो तुमच्या योजनांचा भाग नाही? हे अगदी चुकीचे आहे.”
न्यूझीलंड विरुद्ध टी-२० मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, अवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या –
सोशल मीडियावर ट्रेंड होतोय ‘जस्टीस फॉर संजू सॅमसन’ हॅशटॅग; गंभीर आहे कारण
पुजारा-रहाणे यांना निरोप देण्याची तयारी सुरू, शुबमन गिलला मिळणार नवी जबाबदारी?
प्लेसिसचे होणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन? प्रशिक्षकांनी दिले संकेत






