सध्या जगभरात सर्व देशांमध्ये फुटबॉल लीग सुरू आहेत. मात्र, नुकतीच या फुटबॉलच्या मैदानातून एक दुःखद घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण क्रीडाजगत हादरलेले दिसून आले. अल्जेरियामधील एका स्थानिक फुटबॉल सामन्यात एका खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेचा भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Algerian Footballer Died On Ground)
कशी घडली घटना
सध्या अल्जेरिया या देशामध्ये द्वितीय दर्जाची लीग-२ ही स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेतील मौलोडीया सालडा (Mouloudua Salda) व एएसएम ओरान (OSM Oran) या संघांमध्ये सामना खेळला जात होता. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये मौलोडीया संघाचा कर्णधार सोफीयान लोकर (Sofiane Loukar) हा आपल्याच संघाच्या गोलकीपरला धडकला. तात्काळ त्याला काहीही झाले नाही.
उपचार घेऊन तो काही काळानंतर पुन्हा मैदानात आला. मात्र, थोड्याच वेळात तो अचानक मैदानावर कोसळला. त्याला लगेच दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचे निधन झाले होते. लोकर केवळ २८ वर्षांचा होता.
🇩🇿Het volgende geval??
Sofiane Lokar(30), aanvoerder van het Algerijnse team Mouloudia Saida, stierf halverwege de wedstrijd aan een hartaanval.
Lokar zakte tijdens het spel in elkaar en alle pogingen van de medici konden hem niet redden.pic.twitter.com/r9KSaWafOR
— Kees (@Kees71234) December 25, 2021
रद्द केला गेला सामना
लोकर याच्या निधनाचे वृत्त समजताच हा सामना रद्द करण्यात आला. सामना रद्द करेपर्यंत ओरान संघ १-० अशा आघाडीवर होता. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही संघांचे खेळाडू दुःखात लोटलेले दिसून येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयएसएल: एटीके मोहन बागानचा नॉर्थ ईस्ट युनायटेडवर निसटता विजय; ह्युगो बॉमॉस ठरला मॅचविनर
‘इस वारी वी टाइटल लै के जाणा है’, विराटकडून मँचेस्टर सिटीच्या मॅनेजरचं पंजाबी स्टाईलमध्ये कौतुक
प्रशिक्षकांशिवाय एटीके मोहन बागानचा पहिलाच पेपर; नॉर्थ ईस्ट युनायटेडचे कडवे आव्हान