fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

मुंबई शहर कबड्डी असो.च्या “पंचवार्षिक निवडणुकीत” जाधव गटाचे सर्व उमेदवार विजयी

मुंबई शहर कबड्डी असो.च्या “पंचवार्षिक निवडणुकीत” मारुती जाधव गटाचे सर्व २५ उमेदवार विजयी झाले. रविवारी दि.२५ ऑगष्ट २०१९ रोजी भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा येथे झालेल्या या लढतीत जाधव गटाने कृष्णा तोडणकर गटाचा पराभव करीत सलग तिसऱ्यांदा ही किमया साधली. २००९साली झालेल्या निवडणुकीत त्यांनी राजाराम पवार गटाचा, तर २०१४ साली अनिल घाटे गटाचा पाडाव केला होता.

यंदा या निवडणुकीत त्यांच्या विरोधात शिवसेना या पक्षाचे पाठबळ लाभलेल्या कृष्णा तोडणकर गटाने आव्हान उभे केले होते. पण त्याचा फायदा या गटाला उचलता आला नाही. मारुती जाधव गटाने पुन्हा एकदा सर्वच जागा जिंकत “हॅट्रिक” साजरी केली. जाधव गटाच्या मनोहर इंदुलकर आणि विश्वास मोरे यांनी या निवडणुकीत सर्वाधिक २८५ मते(प्रत्येकी) मिळविली. तर तोडणकर गटाकडून सचिन अहिर यांना २३०मते मिळाली. या निवडणुकीत ४९५ प्रतिनिधींपैकी ४८१ प्रतिनिधींनी मतदान केले. १६मते बाद ठरली, तर ४६५ मते ग्राह्य ठरली.

उमेदवारांना मिळालेली मते खालील प्रमाणे. ( कंसात मिळालेली मते)
जाधव गट :- १)मनोहर इंदुलकर(२८५); २)विश्वास मोरे(२८५); ३)शुभांगी पाटील(२७५); ४)शरद कालंगण(२७४); ५)भाई जगताप(२७२); ६)मारुती जाधव(२७१); ७)अनिल घाटे(२७१); ८)रामचंद्र जाधव(२७०); ९)सुशील ब्रीद(२६९); १०)दिनेश पाटील(२६९); ११)महेंद्र हळदणकर(२६८); १२)नितीन कदम(२६६); १३)विद्याधर घाडी(२६५); १४)मिलिंद कोलते(२६५); १५)चंद्रशेखर राणे(२६२); १६)मनोहर साळवी(२६२); १७)अनिल केशव(२६१); १८)शिवकुमार लाड(२६०); १९)भरत मुळे(२६०); २०)संजय सूर्यवंशी(२६०); २१)आनंदा शिंदे(२५९); २२)शिवाजी बावडेकर(२५७); २३)गो. नी. पारगावकर(२५१); २४)राजामनी नाडार(२५१); २५)नितीन विचारे(२४९).

तोडणकर गट :- १)सचिन अहिर(२३०); २)राजेश पाडावे(२१६); ३)सचिन पडवळ(२११); ४)कृष्णा तोडणकर(२०५); ५)दीपक मसुरकर(२०५); ६)महेश सावंत(२०३); ७)सुधीर देशमुख(२०३); ८)अंकुश पाताडे(२०२); ९)सिद्धेश चव्हाण(२०१); १०)सचिन कासार(१९९); ११)संतोष पारकर(१९८); १२)शरद गावकर(१९७); १३)मेघाली म्हसकर(१९६); १४)संदीप वरखडे(१९५); १५)तुकाराम साटम(१९४); १६)महेंद्र साळवी(१९३); १७)मंगेश घेवडे(१९२); १८)नितीन राणे(१८९); १९)गणेश रेवणे(१८८); २०)राम पाटील(१८४); २१)दिगंबर शिरवाडकर(१८६); २२)पराग सुर्वे(१८९); २३)संतोष विश्वेकर(१७९); २४)सुधा येसरे(१८१); २५)जयेश होरंबळे(१७९).

You might also like