टी20 विश्वचषक 2022मधील सुपर 12 फेरीला सुरुवात झाली आहे. यातील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात खेळला जात आहे, तर दुसरा सामना इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघात खेळला जाईल. मात्र, अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वीच इंग्लंड संघाचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने टी20 विश्वचषकात मैदानांवर वापरल्या जाणाऱ्या सीमारेषेवरील दोरीबद्दल राग व्यक्त केला आहे.
खरं तर, बेन स्टोक्स (Ben Stokes) याला राग येण्यामागील कारण म्हणजे, संघाचा वेगवान गोलंदाज रीस टॉपलीचा पाय सीमारेषेवरील दोरीला लागून दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो या स्पर्धेतून बाहेर पडला.
बेन स्टोक्स याने या मुद्द्यावर इंग्लंडची वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “हा मूर्खपणा आहे. दुर्दैवाने यामुळे आमचा एक खेळाडू दुखापतग्रस्त झाला आणि विश्वचषकातून बाहेर पडला. मला विश्वास आहे की, या समस्यावर लक्ष दिले जाईल. मात्र, आपल्या सर्वांना माहिती आहे की, सर्वांना मैदानावर आपले नाव दाखवणे गरजेचे आहे, पण तुम्हाला खेळाडूंच्या सुरक्षेकडेही पाहावे लागेल. बाऊंड्री लाईनवर त्याचा पाय पडला आणि त्याला दुखापत झाली. त्यामुळे तो या विश्वचषकातून बाहेर पडला. आम्हाला रीस टॉपली याची खूप आठवण येईल. म्हणून मी या घटनेनंतर खूप रागात आहे.”
Is anyone else feeling sick about the Reece Topley news? The guy can't catch a break and deserved his moment on the big stage 💔
He's a fighter and still young so he'll be back 💪💪💪 pic.twitter.com/XMKzqtJf0J
— England's Barmy Army 🏴🎺 (@TheBarmyArmy) October 19, 2022
खरं तर, आयसीसी स्पर्धेत अनेक स्पॉन्सर आपला पैसा गुंतवतात. त्यामुळे त्यांचे नाव सामन्यादरम्यान सतत दिसावे म्हणून मैदानावर प्रत्येक जागी त्यांचे नाव प्रदर्शित केले जाते. याच कारणामुळे सीमारेषेवरील दोरी अशाप्रकारे बनवली गेली आहे, ज्याने स्पॉन्सरचे नाव त्यावर दिसेल. साधारणत: सीमारेषेच्या दोरीची उंची 4-5 सेंटीमीटर इतकी असते, परंतु या मोठ्या स्पर्धांमध्ये ती उंची 20 सेंटीमीटर होते आणि त्याची जाडीदेखील 20 सेंटीमीटर असते. यामुळे खेळाडूंना क्षेत्ररक्षण करणे खूप कठीण होते. सीमारेषेच्या दोरीवर मोठ-मोठे पोस्टर लावले जातात, ज्यावर स्पॉन्सर्सचे नाव लिहिलेले असते.
आता बेन स्टोक्सने व्यक्त केलेला राग लक्षात घेऊन यावर काही सुधारणा होते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘राशिद खान असेल इंग्लंडसाठी सर्वात मोठा धोका’, माजी कर्णधाराने आधीच केले सावध
मेलबर्नवरून आनंदाची बातमी, भारत-पाकिस्तान सामन्यावरील संकटाचे ढग दूर!