क्रिकेटविश्वात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. विराट कोहली, एमएस धोनी किंवा सचिन तेंडुलकर असो यांच्या चाहत्यांची संख्या न मोजण्याइतकी आहे. त्यामुळे चाहते त्यांची नक्कल करण्यात मागचा पुढचा विचार करत नाहीत. विशेष म्हणजे, विराट आणि सचिनसारखे दिसणारे व्यक्ती प्रचंड चर्चेत असतात. आता या यादीत वेस्ट इंडिजचा अष्टपैलू सुनील नारायण याच्या नावाचाही समावेश झाला आहे. खरं तर, नारायण आंतरराष्ट्रीय लीग टी20 स्पर्धेत अबू धाबी नाईट रायडर्स संघाचा कर्णधार म्हणून खेळत आहे.
आंतरराष्ट्रीय लीग टी20 (International League T20) स्पर्धेदरम्यान हुबेहूब सुनील नारायण (Sunil Narine) दिसणाऱ्या व्यक्तीने सोशल मीडियावर धमाल केली आहे. नारायणसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इतकेच नाही, तर आपल्यासारख्या हुबेहूब व्यक्तीला पाहून नारायणही हैराण झाला.
खरं तर, हा व्हिडिओ अबू धाबी नाईट रायडर्स विरुद्ध गल्फ जायंट्स (Abu Dhabi Night Riders vs Gulf Giants) संघातील एका सामन्यादरम्यानचा आहे. या सामन्यादरम्यान एक व्यक्ती हुबेहूब सुनील नारायणसारखा दिसत आहे. इतकेच नाही, या व्हिडिओत दिसते की, आपल्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला पाहून नारायणही हसू लागतो आणि हैराण होतो. या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.
https://www.instagram.com/reel/CnsPWcmrwhT/?utm_source=ig_embed&ig_rid=65196233-3ec1-4f27-8008-021e2985ad22
सुनील नारायण याच्या स्पर्धेतील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. त्याने यादरम्यान 26.40च्या सरासरीने 5 विकेट्स घेतल्या आहेत.
स्पर्धेबाबत बोलायचं झालं, तर आयएलटी20 (ILT20) स्पर्धेत डेझर्ट वायपर्स (Desert Vipers) संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. तसेच, गल्फ जायंट्स संघ दुसऱ्या स्थानी आहे. हैराण करणारी बाब अशी की, अबू धाबी नाईट रायडर्स संघाने आतापर्यंत खेळलेले पाचही सामने गमावले आहेत. त्यामुळे ते गुणतालिकेत सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहेत. (all rounder sunil narines lookalike spotted ilt20 cricket see video here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत- न्यूझीलंडसाठी ‘करो वा मरो’ सामना, कोण कोणावर भारी? एका क्लिकवर घ्या जाणून
‘फक्त हे काम कर, मग जगावर राज्य करशील’, अनुभवी शमीचा ‘वेगाच्या बादशाह’ला मोलाचा सल्ला