---Advertisement---

२२ मे पासून सुरु होत असलेल्या विन्सी प्रीमियर लीगबद्दल सर्व माहिती

On: सोमवार, मे 18, 2020 6:05 PM
---Advertisement---

मागील काही दिवसांपासून कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे सर्वच क्रीडाक्षेत्र ठप्प आहे. पण आता हळू हळू ते सुरु करण्याच्या दिशेने पाऊले उचलली जात आहेत. येत्या २२ मे पासून ३१ मे पर्यंत वीन्सी प्रीमीयर लीग टी१० ही स्पर्धा सुरु होत आहे. कोरोना व्हायरसच्या संकटानंतर ही खेळली जाणारी पहिलीच फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धा असेल.

ही स्पर्धा सेंट व्हिन्सेंट या कॅरिबियन बेटावरील अर्नोस वेल स्पोर्टिंग कॉम्प्लेक्स येथे होणार आहे. ६ संघांमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेत एकूण ३० सामने होणार आहेत. साधारण प्रत्येक दिवशी ३ सामने होतील. तसेच सर्व सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे.

मात्र असे असले तरी कोरोना व्हायरसच्या संकटापासून सुरक्षा म्हणून रिकाम्या स्टेडियममध्ये सामने होतील म्हणजेच प्रत्यक्ष स्टेडियममध्ये उपस्थित राहून चाहत्यांना सामने पहाता येणार नाही.

वेस्ट इंडिजचे काही स्टार खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. यात केसरिक विलियम्स, सुनील अँब्रीस, ओबेड मॅककॉय अशा खेळाडूंचा समावेश आहे.

याबरोबरच खेळाडूंना या स्पर्धेत चेंडूला थुंकी किंवा लाळ लावण्यास बंदी असेल. ही बंदी घालणारी वीन्सी प्रीमीयर लीग ही पहिली स्पर्धा असेल.

या स्पर्धेत खेळणारे संघ आणि त्यांचे प्रशिक्षक – 

ग्रेनेडाइन्स डायव्हर्स – इयान ऍलन

साल्ट पॉन्ड ब्रेकर्स – ओलान्झो जॅक्सन

ला सॉफ्रीयर हायकर्स – इर्विन वॉरिकन

डार्क व्ह्यू एक्सप्लोरर्स – बेर्ट्रम स्टेप्लेटन

फोर्ट शार्लोट स्ट्रायकर्स – केनरॉय मार्टिन

बोटॅनिक गार्डन्स रेंजर्स – निक्सन मॅक्लेन

सामन्यांची वेळ आणि ठिकाण –

वेळ  – भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६.०० ते रात्री ११.३० पर्यंत

ठिकाण – अर्नोस वेल स्पोर्टिंग कॉम्प्लेक्स, सेंट व्हिन्सेंट

ट्रेंडिंग घडामोडी – 

विराटही दुसऱ्यांच्या लग्नात जाऊन जेवणं करुन धरायचा घरचा रस्ता

आणि आयपीएलमध्ये मुंबईकर चाहत्यांनी उडवली मुंबईकर खेळाडूचीच हुर्ये, कारण…

विराटला चोरी करायची होती मास्टर ब्लास्टरची ही गोष्ट, पण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---