इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा पुढचा कर्णधार कोण, असा प्रश्न मागच्या अनेक महिन्यांपासून उफस्थित केला जात आहे. एमएस धोनी याने आयपीएलमधून अद्याप निवृत्ती घेतली नाहीये. मात्र, धोनी पुढच्या आयपीएल हंगामात खेळेलच अशी खात्री देखील अद्याप दिली गेली नाहीये. असात सीएसकेला आगामी हंगामात नव्या कर्णधाराची गरज पडली, तर ऋतुराज गायकवाड चांगला पर्याय आहे, असे मत माजी दिग्गज अंबाती रायुडू याने व्यक्त केले.
एमएस धोनी (Ruturaj Gaikwad) याच्या नेतृत्वात सीएसकेने यावर्षी आपली पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकली. अंबाती रायुडू (Ambati Rayudu ) देखील या संघाचा भाग होता आणि ऋतुराजदेखील धोनीच्या नेतृत्वात खेळत होता. एमएस धोनी (MS Dhoni) याचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असल्याचे बोलले जात होते आणि याच पार्श्वभूमीवर खेळाडूंनी पूर्ण प्रयत्न करून ट्रॉफी जिंकली. पण धोनीने ट्रॉफी जिंकल्यानंतरही निवृत्ती जाहीर केली नाही. पण धोनी जर पुढच्या आयपीएलमध्ये खेळला नाही, तर ऋतुराज गायकवाड सीएसकेच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार असेल, असे सांगितले जात आहे.
आयपीएल 2022 मध्ये ऋतुराजने 500पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. धोनीच्या नेतृत्वात त्याच्याकडे कर्णधारपाचेही गुण आले आहेत. अंबाती रायुडू नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी म्हणाला की, “ऋतुराज गायकवाडकडे एका दशकापेक्षा अधिक काल सीएशकेचे नेतृत्व करण्याची चांगली संधी आहे. धोनीने त्याला खूप चांगल्या पद्धतीने तयार केले आहे. भारतीय संघही त्याचा पूर्ण उपयोग करून घेईल. तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये खेळणारा खेळाडू आहे.”
दरम्यान, ऋतुराज गायकवाड आशियाई गेम्स 2023 मध्ये भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याने यापूर्वी भारतासाठी एक वनडे आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 135, तर वनडे क्रिकेटमधअये 19 धावा केल्या आहेत. 2020 मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते आणि आतापर्यंत 52 आयपीएल सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 1797 धावा निघाल्या असून यात 1 शतक आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे. (Ambati Rayudu expressed the opinion that Ruturaj Gaikwad was the new captain of CSK)
महत्वाच्या बातम्या –
लवकच होणार भारताच्या नव्या कर्णधाराची घोषणा! आयर्लंड दौऱ्यासाठी घेतला जाणार निर्णय
‘पाऊस झाला तर चांगलंच होईल’, पराभवापासून वाचण्यासाठी कांगारू खेळाडूचं मोठं विधान