टीम इंडियाचा माजी फलंदाज अंबाती रायुडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांकडून खेळला आहे. अंबातीनं 2010 ते 2017 पर्यंत मुंबई इंडियन्ससाठी एकूण 114 आयपीएल सामने खेळले आहेत. या दरम्यान तो तीन आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघाचा महत्त्वाचा भाग होता.
दरम्यान, अंबाती रायुडूनं मुंबई इंडियन्सच्या टीममधील कल्चर बाबत एक असं वक्तव्य केलं, ज्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना अंबाती रायुडूनं चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सच्या टीम कल्चरमध्ये मोठा फरक असल्याचं सांगितलं.
अंबाती रायडू म्हणाला, “चेन्नई सुपर किंग्जचं लक्ष प्रक्रियेवर असतं. त्यावर सामन्याच्या निकालाचा प्रभाव पडत नाही. मात्र मुंबई इंडियन्सचं कल्चर थोडं वेगळं आहे. मुंबईच्या टीमचं जास्त लक्ष विजय प्राप्त करण्याकडे असतं. त्यांचं कल्चर असं आहे की, जिंकण्याशी कुठलीही तडजोड नाही”.
अंबाती रायुडू पुढे म्हणाला की, “सीएसके आणि मुंबईचं कल्चर वेगवेगळं आहे, परंतु शेवटी दोन्ही संघ खूप मेहनत घेतात. माझ्या मते, चेन्नईच्या संघाचं कल्चर जास्त चांगलं आहे. तुम्ही मुंबई इंडियन्सकडून जास्त खेळाल तर तुमच्या डोक्याचा भुगा होईल. जेव्हा मी मुंबई इंडियन्सकडून खेळत होतो, तेव्हा माझ्या खेळात बरीच सुधारणा झाली. जर तुम्ही सामना जिंकला नाही तर तेथे कोणताही बहाना चालत नाही. मुंबई इंडियन्सचं कल्चर असं आहे की, तुम्ही तेथे सातत्यानं चांगली कामगिरी करत राहता. मात्र चेन्नईचं कल्चर थोडं वेगळं आहे. तेथे तुम्हाला चांगलं बनवलं जातं, ते सुद्धा कोणतीही जास्त मेहनत न घेता.”
अंबाती रायुडूनं आयपीएलमध्ये 203 सामने खेळले आहेत. या दरम्यान त्यानं 28.05 ची सरासरी आणि 127.54 च्या स्ट्राइक रेटनं 4348 धावा ठोकल्या आहेत. त्याच्या नावे आयपीएलमध्ये 1 शतक आणि 22 अर्धशतकं आहेत. गेल्या हंगामात चेन्नईला विजेतेपद जिंकवून दिल्यानंतर त्यानं निवृत्ती घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
BCCI च्या अधिकाऱ्यांचा पगार किती असतो? वर्षाची कमाई किती? आकडेवारी जाणून बसेल धक्का!