भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज अंबाती रायुडू येत्या काळात कॅरेबियन प्रीमियल लीगमध्ये खेळताना दिसू शकतो. इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगाम संपताच रायुडूने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. अशातच आता त्याने सीएसल फ्रँचायजी सेंड किट्स ऍन्ड नेविस प्रॅट्रियट्स संघासोबत आगामी हंगामासाठी करार केला आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार अंबाती रायुडू (Ambati Rayudu) सीएसच्या आगामी हंगामात खेळू शकतो. सेंट किट्स ऍन्ड नेविस पॅट्रियट्स (St Kitts and Nevis Patriots) संघासोबत तो मार्की खेळाडू म्हणून जोडला गेला आहे. तत्पूर्वी मेजल लीगच्या (Major League) पहिल्या हंगामात रायुडू खेळण्याच्या तयारीत होता. त्याने टेक्सस सुपर किंग्जसोबत करार देखील केला होता. मात्र, ऐन वेळी त्याने या स्पर्धेतून माघार घेतली. माहितीनुसार बीसीसीआय कुलिंग ऑफ पीरियड सुरू करण्याच्या विचारात आहे. यामुळे निवृत्ती घेतल्यानंतर खेळाडूंना पुढचे ठराविक काळ विदेशातील लीग खेळता येणार नाहीत.
बीसीसीआयने या कुलिंग पीरियडविषयी अद्याप पुठली ठोस माहिती दिली नाहीये. पण रायुडूने याच कारणास्तव मेजर लीगमधून माघर घेतली असू शकते. अशात सीपीएलच्या आगामी हंगामात रायुडू खेळणार की नाही, हे पाहण्यासारखे असेल. रायुडू जर या लीगचा भाग बनला, तर तो प्रवीण तांबेनंतर या लीगमध्ये खेळणारा दुसरा भारतीय ठरेल. तांबेने 2020 साली ट्रिनबागो नाईट रायडर्स संघासासाठी सीपीएल खेळली होती.
दरम्यान, आयपीएल 2023 मध्ये रायुडू चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीचा भाग होता. एमएस धोनी याच्या नेतृत्वातील या फ्रँचायझीने एकूण 16 सामने खेळले. यापैकी 12 सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने 142 धावा केल्या. अंतिम सामन्यात त्याने महत्वाच्या वेळी येऊन ताबडतोड खेळी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. खेळाडूंच्या अप्रतिम प्रदर्शनाच्या जोरावर सीएसने यावर्षी आपली पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकली. सोबतच रायुडू सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकणारा खेळाडू देखील ठरला. त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने 203 सामन्यांमध्ये 4348 धावा केल्या आहेत. यात 1 शतक तर 22 अर्धशतके सामील आहेत. (Ambati Rayudu will return to the field, know which team will be entered)
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषकात शिखर धवन पार पाडू शकतो प्रमुख भूमिका, आकडेवारी वाचून कळेल महत्व
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, पण विदेशी लीग खेळण्याबाबत रायुडूचा अचानक मोठा निर्णय