बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली नवजात मुलगी वामिकाची जन्मापासूनच इंटरनेटवर बरीच चर्चा आहे. अनुष्काने शेअर केलेली मुलीची पहिली झलक खूपच पसंत केली जातेय. अशा परिस्थितीत, अग्रगण्य दूध उत्पादक कंपनी अमूलने ही आपल्याच शैलीतील एक व्यंगचित्र सार्वजनिक केले आहे. मूळ छायाचित्राप्रमाणे या व्यंगचित्राला देखील चाहत्यांची पसंती लाभताना दिसतेय.
भारतातील आघाडीचा डेअरी ब्रँड असलेल्या अमूलने सेलिब्रिटी कपल आणि त्यांची मुलगी यांच्या मूळ छायाचित्राचे व्यंगचित्र आपल्या सोशल मीडिया खात्यांवरून सार्वजनिक केले. या व्यंगचित्रातील कॅप्शनमध्ये अमूलने लिहिले की,
‘अमूल टोपिकल: विरुष्काने आपल्या मुलीचे नाव ठेवले आहे!’ त्यानंतर, अमूलने बनविलेल्या व्यंगचित्रामध्ये लिहिले आहे की, ‘वामिका.. बडी होकर यमी खा… नेशन हर्ट थ्रोब.’
अलीकडेच अनुष्काने तिच्या मुलीच्या नावावरून पडदा उठवताना एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये लिहिले होते की, ‘आम्ही प्रेमाने एकत्र राहिलो, वामिकाच्या आगमनाने आमच्या प्रेमाला आणि विश्वासाला एक नवीन स्थान मिळाले. काही मिनिटांत अश्रू, आनंद, काळजी सर्वकाही कळले. आमची झोप उडाली आहे परंतु हृदय भरले आहे. तुम्हा सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि प्रार्थनेबद्दल मनापासून धन्यवाद.’ या पोस्टवर कमेंट करताना विराटने लिहिले, ‘माझे संपूर्ण जग एकाच चौकटीत.’
विराट प्रथमच झाला पिता
अनुष्का शर्माने मागील महिन्यात आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला. या आनंदाच्या क्षणी आपण आपल्या पत्नीसोबत असायला हवे, या विचाराने विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौरा निम्म्यावर सोडून पालकत्व रजा घेऊन भारतात दाखल झाला होता.
महत्वाच्या बातम्या:
शेतकरी आंदोलन: वातावरण तापलं! केरळमध्ये सचिन तेंडुलकरच्या पुतळ्यावर ओतला काळा रंग
आयपीएल २०२१ साठी केली इतक्या क्रिकेटपटूंनी नावनोंदणी
सध्या चर्चेत असलेल्या रिहानाचे ख्रिस गेलशी आहे खास नाते, जुना व्हिडिओ होतोय व्हायरल