पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेत दोन्ही संघाच्या गोलंदाजांकडून जबरदस्त खेळ बघायला मिळत आहे. रावलपिंडी येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्टजेने पाकिस्तानच्या पहिल्या डावात शानदार कामगिरी केली. नॉर्टजेच्या भेदक गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानचा पहिला डाव 272 धावांवर रोखण्यात यश मिळाले.
प्रथम फलंदाजी करत असलेल्या पाकिस्तानला फलंदाजांकडून उत्तम कामगिरी अपेक्षा होती. मात्र नॉर्टजेच्या भेदक गोलंदाजीसमोर कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूचा निभाव लागला नाही. नॉर्टजेने 24.3 षटकात 56 धावा देत 5 गडी बाद केले.
👀 WATCH 5 of the best from speedster Anrich Nortje#PAKvSA #SeeMeOnThePitch pic.twitter.com/ktLh32eK6I
— Proteas Men (@ProteasMenCSA) February 6, 2021
नॉर्टजेच्या शानदार कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकेला सामन्यात आघाडी मिळवण्याची महत्त्वाची संधी होती. मात्र पाकिस्तानचे दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव केवळ 201 धावांवर रोखला. पाकिस्तान कडून हसन अलीने शानदार कामगिरी केली. हसनने 15.4 षटकात 54 धावा देत 5 बळी मिळवले.पाकिस्तानने पहिल्या डावात 272 धावा बनवलेल्या असल्याने त्यांना 71 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली आहे.
दरम्यान पाकिस्तानचा दुसरा डाव तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानच्या ६ बाद १२९ धावा झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात शानदार कामगिरी केली. पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला त्यांनी खेळपट्टीवर स्थिरावण्याची संधी दिली नाही. जॉर्ज लिंडेने अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश करत ९ षटकात केवळ १२ धावा देत ३ बळी घेतले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानकडून ओदीशाचा धुव्वा
राज्य निवडचाचणी कुस्ती स्पर्धेत बीड जिल्ह्यातील पैलवान अमोल मुंढे विजयी! आता गाजवणार पंजाबचं मैदान