टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये गुरुवारी (२९ जुलै) भारताची सुरुवात जबरदस्त झाली. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट मिळवले. दुसरीकडे हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघानेही विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. आता तिरंदाजीतूनही आनंदाची बातमी येत आहे. पुरुष तिरंदाजीच्या एकेरी गटात राऊंड ३२ मधील भारत आणि चीन संघातील महत्त्वाचा सामना पार पडला. या सामन्यात भारताच्या अतनू दासने शानदार कामगिरी करत चीनच्या डेंग यू- चेंगला ६-४ असा धुव्वा उडवला.
या सामन्यात पहिल्या सेटमध्ये भारताच्या अतनू दासने २७ गुण मिळवले होते, तर चेंगने २६ गुण मिळवले होते. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये अतनूने २७ गुण मिळवले, तर चेंगने २८ गुण मिळवत हा सेट आपल्या नावावर केला. तिसऱ्या सेटमध्ये अतनूने पुनरागमन करत २८-२६ ने सेट जिंकला. पुढे चौथा सेट चेंगने २८- २७ ने जिंकला. त्यानंतर अतनूने २८-२६ ने पाचवा सेट जिंकला. (Archer Atanu Das beats Chinese Taipei’s Deng Yu-Cheng 6-4 in men’s individual round of 32 match)
#TeamIndia | #Tokyo2020 | #Archery
Men's Individual 1/32 Eliminations ResultsArcher @ArcherAtanu progresses into Round 2 with a thrilling 6-4 win over Yu-Cheng Deng of Chinese Taipei. #WayToGo champ! 👏🙌🏹🇮🇳 #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/dhMuoCdDb7
— Team India (@WeAreTeamIndia) July 29, 2021
अतनू दासने राऊंड १६ मध्ये प्रवेश केला असून आता त्याचा पुढील सामना आज ८.२१ वाजता होणार आहे.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-नौकानयनात भारतीय जोडीचे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन; पटकावला ‘हा’ क्रमांक
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना