पुणे: पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पुणे जिल्हा अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात अमेय सुतागट्टी, अर्णव भाटिया या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंवर संघर्षपूर्ण विजय मिळवला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत अमेय सुतागट्टीने एस अनुरागचा टायब्रेकमध्ये 6-5(7-4) असा पराभव केला. चुरशीच्या लढतीत अर्णव भाटियाने सय्यम पाटीलला टायब्रेकमध्ये 6-5(7-3) असे पराभूत केले. सिद्धांत थोरवेने अर्णव कुलकर्णीचा 6-2 असा सहज पराभव केला.
मुलींच्या गटात चौथ्या मानांकित अस्मि टिळेकर व श्रेया होंकन यांनी अनुक्रमे यशविका दास व प्रिया शर्मा यांचा 6-0अशा सारख्याच फरकाने पराभव केला. तसेच, या स्पर्धेत जिल्ह्यांतून एकूण 177 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: 14 वर्षाखालील मुले:
अमेय सुतागट्टी वि.वि.एस अनुराग 6-5(7-4);
त्रिशिक वाकलकर वि.वि.लेशा नायडू 6-1;
सुमय माहुली वि.वि.आयुश बच्छाव 6-0;
सिद्धांत थोरवे वि.वि.अर्णव कुलकर्णी 6-2;
अर्णव भाटिया वि.वि.सय्यम पाटील 6-5(7-3);
14 वर्षाखालील मुली:
मनस्वी वाकोडे वि.वि.राशी सोनावणे 6-0;
श्रेया होंकन(12) वि.वि.प्रिया शर्मा 6-0;
अस्मि टिळेकर(4) वि.वि.यशविका दास 6-0;
ह्रितीका कापले(3) वि.वि.एस प्राची 6-0;
मृणाल शेळके(8) वि.वि.समृद्धी काटे 6-4;
रितिका मोरे वि.वि.शर्मिष्ठा कोंडरे 6-0;
आर्या बोराडे वि.वि.आदीश्री जोशी 6-3;
सुहाना कन्नन(14) वि.वि.पलाक्षी राऊत 6-1.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रतिक्षा संपली!! टी२० विश्वचषकात बारा वर्षांनंतर इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध साकारला पहिला विजय
आदिल राशीदच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला ‘धोकादायक’ आंद्रे रसेल, पाहा कशाप्रकारे झाला क्लीन बोल्ड
‘इंशाल्लाह, पाकिस्तान भारताला नक्कीच हरवेल,’ इमरान खान यांनी व्यक्त केला विश्वास