पुणे,दि.15 डिसेंबर 2023: मा. शरदचंद्रजी पवार आणि मा. अण्णासाहेब पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त खराडी जिमखाना व आर्या स्पोर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्या स्पोर्टस टी-20 क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत स्टार इलेव्हन, किंग्ज स्पोर्टस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
खराडी जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पियूश सोहनी (96धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर किंग्ज स्पोर्टस संघाने फायटर्स संघाचा 70 धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात विक्रम चौधरी(57 धावा)याने केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर स्टार इलेव्हन संघाने सनराईज इलेव्हन संघाचा 39 धावांनी पराभव केला.
निकाल: साखळी फेरी:
किंग्ज स्पोर्टस: 20षटकात 6बाद 210धावा (पियूश सोहनी 96(40,9×4,7×6), शंतनु खेनत 43(23,5×4,1×6), आकाश करगावे 24, ऋषीकेश दौंड 10, शुभम खटले 1-25, स्वप्निल भालेराव 1-19) वि.वि.फायटर्स: 15.4 षटकात सर्वबाद 140धावा(गणेश मिसाळ 36(20,6×4,1×6), स्वप्निल भालेराव 15, आकाश करगावे 4-38, कृष्णा जैवाल 3-26, सिध्देश वरघंटी 2-33); सामनावीर – पियूश सोहनी; किंग्ज स्पोर्टस संघ 70धावांनी विजयी;
स्टार इलेव्हन: 20 षटकात 8बाद 160धावा(विक्रम चौधरी 57(37,5×4,3×6), वैभव बंबेरू25(12,2×4,1×6), कृष्णा ठाकूर नाबाद 22, समीर मोमीन 2-35, साबी शेख 2-24, श्रेयस सुरवसे 1-33) वि.वि.सनराईज इलेव्हन: 20 षटकात 4बाद 121धावा(तुषार भोगवडे 40(30,5×4), सिध्देश जी 36(33,3×4), रविकांत सरोज 1-10, कृष्णा ठाकूर 1-23); सामनावीर – विक्रम चौधरी; स्टार इलेव्हन संघ 39 धावांनी विजयी.
महत्वाच्या बातम्या –
हार्दिकच्या ‘या’ अटीपुढे मुंबई इंडियन्सने टेकले गुडघे, मजबुरीने करावा लागला रोहितचा पत्ता कट; जाणून घ्याच
INDvsSA: वनडे मालिकेत द्रविड नसेल भारताचा मुख्य प्रशिक्षक, ‘हे’ असतील नवे Head Coach; काय कारण?