भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 वाटून देण्यात आले. त्याच वेळी, भारत आणि कॅनडाचे खेळाडू क्रिकेट खेळू शकले नाहीत तर दोन्ही संघांचे खेळाडूंनी फुटबॉल खेळताना पहायला मिळाले. वास्तविक, क्रिकेट सामना सुरू होण्यापूर्वी संघ प्रथम फुटबॉल खेळून सराव करतात. याशिवाय दोन्ही संघांचे खेळाडू खूप मस्ती करताना दिसले. तसेच, खेळाडूंनी चाहत्यांना निराश केले नाही. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने चाहत्यांकडे जाऊन ऑटोग्राफ दिला. यासोबतच चाहत्यांनी टीम इंडियाच्या विकेटकीपर बॅट्समनसोबतचे फोटोही क्लिक केले.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने कॅनडाच्या खेळाडूं सोबत वेळ घालवला. वास्तविक, अनेक कॅनडाचे खेळाडू भारतीय कर्णधार रोहित शर्माला घेरताना दिसले. कॅनडाच्या संघातील अनेक खेळाडू भारतातील आणि भारतीय वंशाचे आहेत. त्याचवेळी भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली मस्तीच्या मूडमध्ये दिसला. विराट कॅनडासह भारतीय संघातील इतर खेळाडूंसोबत हसताना आणि विनोद करताना दिसला. असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Virat Kohli with the Canada team. ❤️
– A lovely moment for them. pic.twitter.com/OTBdyQF0fD
— Johns. (@CricCrazyJohns) June 15, 2024
टीम इंडियाने यंदाच्या विश्वचषकात शानदार कामगिरी केली आहे. साखळी फेरीत भारताने तीनही सामन्यात विजय मिळवून सुपर-8 साठी पात्र ठरला. गुप्र अ मध्ये भारत 7 गूणांसह अव्वल स्थानी आहे. त्याच प्रमाणे भारतीय संघाचा पुढच्या फेरीत 20 जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध बारर्बाडोस येथे सामना होणार आहे. तर 22 जून रोजी भारत आणि बांग्लादेश यांच्यांत सामना होण्याची शक्यता आहे तर सुपर-8 मधील शेवटच्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने असणार आहेत.
महत्तवाच्या बातम्या-
बाबरपासून रिजवानपर्यंत, सगळ्यांचे पगार कापणार पीसीबी! पाकिस्तानी खेळाडूंवर बोर्ड नाराज
या ‘तीन’ पाकिस्तानी क्रिकेटपटूंची कारकीर्द संपली! यापुढे संघात स्थान मिळणे कठीण
टी20 विश्वचषकादरम्यान दिग्गज खेळाडूनं घेतली निवृत्ती, दोन देशांकडून खेळला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट