इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळल्या जाणाऱ्या ऍशेस मालिका (ashes series) या स्पर्धेची बुधवारी (८ डिसेंबर) सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना ब्रिसबेनच्या गाबा स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंड संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने या सामन्यातून क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. पण तो पुनरागमनात मोठी खेळी करू शकला नाही. बेन स्टोक्स (ben stokes) मागच्या काही माहिन्यांपासून मानसिक आरोग्याच्या कारणास्तव विश्रांतीवर होता. त्याने यादरम्यान त्याच्या हाताच्या बोटाची शस्त्रक्रीया देखील केली होती.
इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुटने सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र रुटने प्रथम फलंदाजी करण्याचा हा घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. बेन स्टोक्स बऱ्याच दिवसांनी इंग्लंडसाठी खेळणार असल्यामुळे चाहत्यांना त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती, पण तो अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. स्टोक्सने या सामन्यात अवघ्या पाचा धावा केल्या.
ऑस्ट्रेलियन संघाचा नवीन कसोटी कर्णधार पॅट कमिन्स (pat cummins) याने स्टोक्सला १३ व्या षटकात बाद केले. कमिन्सने या सामन्यात एकूण पाच विकेट्स घेतल्या, त्यापैकी स्टोक्सची विकेट ही त्याची पहिली विकेट होती.
Aye aye, skipper!
Pat Cummins' first Test wicket as captain is the dangerous Ben Stokes! #OhWhatAFeeling@Toyota_Aus | #Ashes pic.twitter.com/AKjsV0qK5c
— cricket.com.au (@cricketcomau) December 8, 2021
बेन स्टोक्सने जेव्हा विकेट गमावली, तेव्हा इंग्लंड संघाची धावसंख्या होती ४ बाद २९ धावा. त्यानंतर दुपारच्या जेवनापर्यंत इंग्लडने एकही विकेटन गमावला नाही आणि संघाची धावसंख्या २६ षटकांमध्ये ४ बाद ५९ होती. दुपारच्या जेवनानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्यांचे उत्कृष्ट प्रदर्शन कायम ठेवले आणि इंग्लंड संघ ५०.१ षटकात अवघ्या १४७ धावा करून सर्वबाद झाला. यानंतर पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.
तत्पूर्वी, वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने डावाच्या पहिल्या चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्सला (०) त्रिफळाचीत केले. यानंतर इंग्लंड संघाच्या फलंदाजीला एकप्रकारे गळती लागल्याचे पाहायला मिळाले. कर्णधार जो रुट देखील शून्य धावांवर बाद झाला. इंग्लंडसाठी जॉस बटरलने सर्वाधिक ३९ धावा केल्या. त्याव्यतिरिक्त ओली पॉपने देखील ३५ धावांचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार पॅट कमिन्स पहिल्या डावात सर्वात फायदेशीर ठरल. त्याने १३.१ षटकांमध्ये ३८ धावा दिल्या आणि ५ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त मिचेल स्टार्क (३५ धावा) आणि जोश हेजलवूडने (४२ धावा) प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तसेच कॅमरून ग्रीनने देखील एक विकेट घेतली.
महत्वाच्या बातम्या –
ऍशेस: कमिन्सचा पंजा अन् इंग्लंड ऑलआऊट; पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व