गेल्या काही महिन्यांपासून सूर्यकुमार यादव हे नाव खूप चर्चेत आहे. इंग्लंड विरुद्ध झालेली टी-२० मालिका असो किंवा नुकतीच श्रीलंका संघाविरुद्ध पार पडलेली वनडे मालिका, सूर्यकुमार यादव चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. तसेच रविवारी (२५ जुलै) श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात देखील त्याने ५० धावांची तुफानी खेळी केली होती. हा सामना भारतीय संघाने ३८ धावांनी आपल्या नावावर केला होता. त्याची फलंदाजी पाहून माजी भारतीय खेळाडू आशिष नेहरा याने त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
सूर्यकुमार यादव हा आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. अशातच मुंबई इंडियन्स संघाचे माजी प्रशिक्षक आशिष नेहरा यांनी सूर्यकुमार यादवचे कौतुक करत म्हटले की, “अनेक सकारात्मक गोष्टी आहेत. परंतु माझ्यासाठी सर्वात मोठा सकारात्मक बाब म्हणजे सूर्यकुमार यादव आहे. ज्याप्रकारे त्याने दोन्ही डावात फलंदाजी केली आहे, परंतु त्या खेळीचे तो मोठ्या खेळीत रूपांतर करू शकला नाही. परंतु जेव्हा तुम्ही एक्स फॅक्टरबद्दल बोलाल सूर्यकुमार यादव मध्यक्रमात आहे यात काही शंका नाही.”(Ashish Nehra prasise suryakumar yadav says he is no less than Virat Kohli and rohit sharma)
तसेच ते पुढे म्हणाले की, “आपण पाहिले की, मुंबई इंडियन्स संघासाठी त्याने डावाची सुरुवात केली आहे. ३ आणि ४ क्रमांकावर देखील त्याने फलंदाजी केली आहे. इथे तो फलंदाजी क्रमात थोड्या खालच्या क्रमांकावर खेळला आहे. परंतु त्याच्या चौकार आणि एकेरी धाव घेण्याबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. ”
“तो आधीपासूनच टी-२० आणि वनडे संघात आहे. श्रेयस अय्यर संघात असला तरी देखील सूर्यकुमारला संधी मिळाली असती. आता टी-२० क्रिकेटमध्ये असे नसेल की, तुमच्याकडे तेच ४ -५ चांगले फलंदाज आहेत. तो विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत पेक्षा काही कमी नाही,” असेही नेहरा म्हणाले.
“जर या फलंदाजांनंतर तुम्ही मला एका फलंदाजाचे नाव घ्यायला सांगितलं तर तो, सूर्यकुमार यादव असेल. तो विराट, रोहित, हार्दिक पंड्या आणि रिषभ पेक्षा कमी नाही. तो त्यांच्या बरोबरीचा आहे. त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे. जरी त्या परिस्थितीत त्याला फलंदाजी करण्याची सवय नसेल, तरी देखील त्याने स्वतःला त्या परिस्थितीशी जुळवून घेतले आहे,” या शब्दांत त्यांनी सूर्यकुमारची स्तुती केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दुखापतींनी पिडलेल्या विराटसेनेसाठी आली आनंदाची बातमी, ‘प्रमुख खेळाडू’ने सुरू केला सराव
कोहलीचा आयपीएल भिडू पडिक्कलला इंग्लंडवरुन का आलं नाही बोलावण? कारण आले पुढे
पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव मुकणार श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्याला?