राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेला साखळी फेरीतील ६८वा सामना संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखालील संघाने ५ विकेट्स राखून जिंकला. या विजयासह राजस्थानने थेट पहिल्या क्वालिफायर सामन्यासाठी आपला दावा ठोकला आहे. राजस्थानच्या या विजयाचा नायक राहिला फिरकीपटू आर अश्विन. चेन्नईविरुद्ध मॅच विनिंग खेळी केल्यानंतर संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवल्यावर अश्विनच्या आनंदाला सीमा नव्हत्या. त्याच्या जल्लोषाची चर्चा सोशल मीडियावर होतेय.
चेन्नई विरुद्ध राजस्थान (CSK vs RR) सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघाने १९.४ षटकात ५ विकेट्स गमावत चेन्नईचे लक्ष्य पूर्ण केले.
चेन्नईच्या १५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालने धुव्वादार अर्धशतक केले. ४४ चेंडू खेळताना त्याने १ षटकार आणि ८ चौकारांच्या ५९ धावांची शानदार खेळी केली. मात्र त्यानंतर राजस्थानची मधली फळी कोलमडली. अशात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत अश्विनने (R Ashwin) नाबाद ४० धावांची धडाकेबाज खेळी केली. अवघे २३ चेंडू खेळताना ३ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने त्याने ही मॅच विनिंग खेळी केली.
त्याच्या या योगदानामुळे राजस्थानने २ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला व नेट रन रेटच्या जोरावर पहिल्या क्वालिफायर सामन्यासाठी पात्रताही मिळवली.
आपल्या संघाला हे घवघवीत यश मिळवून दिल्यानंतर अश्विनने आक्रमक जल्लोष केला. मोठ्याने ओरडत त्याने सेलिब्रेशन (R Ashwin Celebration) केले. अश्विनव्यतिरिक्त त्याची पत्नी प्रिती नारायण (R Ashwin Wife) आणि मुलगीही भलत्याच खुश झालेल्या दिसल्या. आयपीएलच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
Playoffs Qualification ✅
No. 2⃣ in the Points Table ✅Congratulations to the @IamSanjuSamson-led @rajasthanroyals. 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/ExR7mrzvFI#TATAIPL | #RRvCSK pic.twitter.com/PldbVFTOXo
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2022
दरम्यान राजस्थान संघाला चेन्नईवरील विजयाने फायदा झाला आहे. त्यांनी १८ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. तसेच पहिल्या क्वालिफायर सामन्यासाठीही पात्रता मिळवली आहे. आता २४ मे रोजी, कोलकाता येथे राजस्थान विरुद्ध गुजरात (Rajasthan Royals vs Gujrat Titans) संघांमध्ये पहिला क्वालिफायर सामना होईल. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करेल. तर पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी आणखी एक संधी मिळेल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ऐकलंत का? ३६ वर्षीय भारतीय क्रिकेटर म्हणतोय, “मी आणखी ३ वर्षे क्रिकेट खेळू शकतो”
हेटमायरच्या पत्नीबद्दल विधान करून फसले गावसकर, चाहत्यांनी कॉमेंट्रीवरून हटवण्याची केली मागणी
एमएसएलटीए सुहाना स्मार्ट १० वर्षाखालील टेनिस सर्किट स्पर्धेत शिवन त्यागीचा सनसनाटी विजय