आशिया चषक २०२२ ची जोरदार तयारी सुरू आहे. संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व आशियाई संघ कसून सरावाला लागले आहेत. यादरम्यान चाहत्यांना भारत आणि पाकिस्तान संघाच्या आशिया चषकासाठीच्या नव्या जर्सीची उत्सुकता आहे. शुक्रवारी (२६ ऑगस्ट) भारताच्या जर्सीचा पहिला फोटो चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. यानंतर आता भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचीही नवी जर्सीही समोर आली आहे.
आयसीसीच्या किंवा इतर कोणत्याही स्पर्धेत क्रिकेटपटू नवी जर्सी घालून (Pakistan New Jersey) मैदानात उतरत असतात. या जर्सीवर त्या स्पर्धेचे नावही लिहिलेले असते. याच कारणामुळे क्रिकेट चाहते संघांच्या आशिया चषकासाठीच्या जर्सीच्या प्रतिक्षेत आहेत.
आशिया चषकातील बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील सामना २८ ऑगस्टला दुबईत होणार आहे. या सामन्यात भारताविरुद्ध पाकिस्तानचे खेळाडू नव्या अवतारात दिसतील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर नव्या जर्सीतील फोटोशूटचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कर्णधार बाबर आझम, यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान, हॅरिस राउफ, फखर जमान आणि इतर खेळाडू नवी जर्सी परिधान केल्याचे दिसत आहे.
त्यांची जर्सी हिरव्या रंगाची असून यावर एका बाजूला पाकिस्तान बोर्डाचा लोगो आणि दुसऱ्या बाजूला आशिया चषकाचा लोगो लावण्यात आला आहे. क्रिकेट चाहत्यांकडून या जर्सीला खूप लाईक केले जात आहे.
Lights 💡 Camera 📸 BTS 🎬
The boys were at their candid best at the broadcast photoshoot for the #AsiaCup2022 😍 #BackTheBoysInGreen pic.twitter.com/lSqbb834Qm
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 25, 2022
महत्त्वाच्या बातम्या-
नवी जर्सी समोर आली रे..! एशिया कपसाठी अशी आहे भारताची जर्सी, लोगोवरील ३ स्टार्सचे खास महत्त्व
भारत वि. पाकिस्तान सामन्यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीचे मोठे वक्तव्य, ‘या’ टीमला म्हटले फेवरेट
अन् डॉन ब्रॅडमन भारताच्या महान फलंदाजाला शिवसेना व बाळासाहेबांबद्दल विचारत होते…