आशिया चषक 2023 स्पर्धेतील तिसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात खेळला जाणार आहे. हा सामना शनिवारी (दि. 02 सप्टेंबर) श्रीलंकेच्या कँडी येथे पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी आजी-माजी दिग्गज खेळाडू आपापली मते मांडत आहेत. यामध्ये आता पाकिस्तानचा माजी अष्टपैलू अब्दुल रज्जाक याच्या नावाचाही समावेश झाला आहे. त्याने कर्णधार बाबर आझम याच्याविषयी मोठे विधान केले आहे. त्याने एका युट्यूब चॅनेलशी बोलताना बाबरला सल्ला मोलाचा दिला आहे.
काय म्हणाला रज्जाक?
एका युट्यूब चॅनेलशी बोलताना अब्दुल रज्जाक (Abdul Razzaq) म्हणाला, की यावेळी पाकिस्तानची सध्याची प्लेइंग इलेव्हन एकदम योग्य आहे. तसेच, बाबर आझम याने भारताविरुद्ध याच प्लेइंग इलेव्हनसोबत उतरले पाहिले. याच संघासोबत तो आपल्या पहिल्या सामन्यात उतरला होता.
बाबरला काय दिला सल्ला?
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू अब्दुल रज्जाक याने बाबर आझम याला मोलाचा सल्ला दिला आहे. त्याने म्हटले, “सध्याची पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन चांगल्याप्रकारे संतुलित आहे. तुमच्याकडे मधल्या फळीत चांगले फलंदाज आणि अष्टपैलू आहेत. तुमच्याकडे गती आणि फिरकी आक्रमणात पूर्ण ताकद आहे. तुमच्याकडे सर्वकाही आहे. तुमच्याकडे एक संघ असला पाहिजे, हे सर्वात चांगले संयोजन आहे. जरी आम्ही भारताविरुद्ध सामना पराभूत झालो, तरीही तुम्ही सध्याच्या संघात बदल केला नाही पाहिजे. हा आमचा सर्वोत्तम संघ आहे.”
कसे असेल पल्लेकेले मैदानातील वातावरण?
भारत विरुद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) संघातील महामुकाबला पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअममध्ये होणार आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट आहे. एका हवामान रिपोर्टनुसार, भारत-पाकिस्तान संघातील या सामन्यात पाऊस व्यत्यय आणू शकतो. हवामान खात्यानुसार, पावसाची शक्यता 91 टक्के आहे. त्यामुळे सामन्या होण्याची शक्यता कमी आहे.
तब्बल 4 वर्षांनंतर भारत-पाकिस्तान एकमेकांशी भिडणार
पाकिस्तान विरुद्ध भारत (Pakistan vs India) संघ वनडे क्रिकेटमध्ये तब्बल 4 वर्षांनंतर एकमेकांचा सामना करतील. सन 2019च्या विश्वचषकात मॅनचेस्टर येथे दोन्ही संघ एकमेकांशी भिडले होते. यानंतर टी20 आशिया चषक आणि दोन वेळा विश्वचषकात दोन्ही संघांचा आमना-सामना झाला आहे. अशात विश्वचषकापूर्वी दोन्ही संघ आशिया चषकात एकमेकांचा सामना करण्यासाठी मैदानात उतरतील. (asia cup 2023 ex pakistani star abdul razzaq gives advice to skipper babar azam before ind vs pak match said this)
हेही वाचाच-
पाकिस्तानविरुद्ध जिंकायचंय? तर भारतीय संघाला ‘या’ 3 समस्यांवर काढावा लागेल तोडगा
गंभीरचे शार्दुलबद्दल वादग्रस्त विधान! म्हणाला, “तो बिट्स अँड पीस खेळाडू”






