पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी आशिया चषक 2023 साठी त्यांचे हायब्रिड मॉडेल स्वीकारल्याबद्दल आशियाई क्रिकेट परिषदेचे आभार मानले आहेत. याबाबत त्यांनी व्हिडीओ अपलोड केला आहे. आशिया चषक 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळवले जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 13 एकदिवसीय सामने खेळवले जातील. तर, त्यापैकी 9 सामने श्रीलंकेत तर 4 सामने पाकिस्तानमध्ये होतील. यापूर्वी या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते पण भारताने आपला संघ शेजारच्या देशात पाठवण्यास नकार दिला होता. 2008 नंतर पहिल्यांदाच बहुराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत. पंधरा वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये 6 संघ सहभागी झाले होते.
आशिया चषकाच्या 4 सामन्यांचे आयोजन करण्याबाबत नजम सेठी म्हणाले की, “एसीसीने आशिया चषक 2023 साठी आमचे हायब्रिड मॉडेल स्वीकारले याचा आम्हाला आनंद आहे. याचा अर्थ असा की पीसीबी कार्यक्रमाचे यजमान आणि श्रीलंका तटस्थ स्थान म्हणून राहील, जे भारतीय क्रिकेट संघाच्या पाकिस्तानला जाण्यास असमर्थतेमुळे आवश्यक होते.”
नजम सेठींनी दिल्या शुभेच्छा
पीसीबी प्रमुख म्हणाले की, “आमच्या उत्कट चाहत्यांना 15 वर्षांत प्रथमच भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) पाकिस्तानमध्ये खेळताना पाहायला आवडले असते, परंतु बीसीसीआयची भूमिका आम्हाला समजली आहे. पीसीबीप्रमाणेच बीसीसीआयलाही सीमा ओलांडण्यापूर्वी सरकारची परवानगी आवश्यक आहे.”
सेठी म्हणाले की, “या पार्श्वभूमीवर, हायब्रीड मॉडेल हा सर्वोत्तम उपाय होता आणि म्हणूनच मी त्याची जोरदार बाजू मांडली. हायब्रीड मॉडेलचा स्वीकार म्हणजे कार्यक्रम मूळ नियोजित प्रमाणे, एसीसी एकत्रितपणे चालेल.”
Najam Sethi, Chair of the PCB Management Committee, thanks the Asian Cricket Council for accepting his hybrid model for the ACC Asia Cup 2023, which is now scheduled from 31 August to 17 September.
Read more ➡️ https://t.co/xNWnm2YJTX pic.twitter.com/hmxSTUHwqv
— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 15, 2023
पुढे म्हणाले की, “गेल्या 15 महिन्यांत, पीसीबीने हाय-प्रोफाइल द्विपक्षीय मालिका तसेच दोन मोठ्या प्रमाणात यशस्वी पाकिस्तान सुपर लीग इव्हेंटचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये जगातील काही आघाडीच्या क्रिकेटपटूंनी भाग घेतला आणि पाकिस्तानच्या उत्कृष्ट व्यवस्था आणि अभूतपूर्व पाहुणचाराचा आनंद लुटला. फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणाऱ्या एसीसी आशिया चषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना असाच अनुभव देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
पाकिस्तानमधील सामने लाहोरमध्ये तर श्रीलंकेतील सामने कॅंडी आणि पल्लेकेले येथे खेळवले जातील. आशिया चषकाच्या वेळापत्रकाला मंजुरी मिळाल्याने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तान संघाचे आगमनही निश्चित झाले आहे. 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे दोन्ही संघ साखळी फेरीत खेळू शकतात.
महत्वाच्या बातम्या-
रैनासोबत घाणेरडी चेष्टा! LPLसाठी केली नव्हती नोंदणी, तरीही लिलावात आलं नाव; पण…
‘वनडे विश्वचषकात टॉप-4मध्ये पोहोचणार पाकिस्तान’, दिग्गजाचा मोठा दावा