भारतीय संघाचा (team india) अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) सध्या चर्चेत आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत त्याची निवड न झाल्यानंतर त्याने एका वादाला तोंड फोडले. पुढे त्याने एका पत्रकारावर त्याच्यासोबत गैरवर्तन केल्याचाही खुलासा केला. मात्र, पत्रकाराचे नाव मात्र सांगितले नाही. माध्यमांतील वृत्तानुसार, आता बीसीसीआय या पत्रकाराचे नाव उघड करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु साहा मात्र त्याच्या नावाच खुलासा करणार नाहीये.
या पत्रकाराने साहावर मुलाखत देण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सोबतच त्याला धमकावण्याचाही प्रयत्न केला आहे. साहाने स्वतःच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून त्या पत्रकारासोबत झालेली व्हॉट्स ॲप चॅट उघड केले आहे. साहाने पत्रकारासोबतच्या चॅटिंगचा स्क्रिनशॉट शेअर केला आणि यानंतर त्याला भारतीय संघाच्या दिग्गजांचे समर्धन देखील मिळाले. माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, तसेच माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनीही साहाला समर्धन दिले आहे. असे असले तरी, त्या पत्रकाराचे नाव सांगण्यासाठी साहा मात्र इच्छुक दिसत नाही.
बीसीसीआयने विचारले तरी नाही सांगणार पत्रकाराचे नाव
या संपूर्ण प्रकरणानंतर एका वृत्तपत्राशी बोलताना त्याने सांगितले की तो या पत्रकाराच्या नावाचा खुलासा करू इच्छित नाही. तो म्हणाला की, “बीसीसीआयने अजूनपर्यंत माझ्याशी चर्चा केली नाहीय. जर त्यांनी मला नाव सांगायला लावले, तर मी त्यांना सांगेल. माझा उद्देश एखाद्याचे करियर बरबाद करणे किंवा त्याला कमी लेखणे नाहीय. याच कारणास्तव मी ट्वीटमध्ये नाव लिहिले नाही. मला माझ्या आई वडिलांनी असे शिकवले नाहीये. माझ्या ट्वीटचा मुख्य उद्देश फक्त एवढाच होता की, मीडियामध्ये काही असे लोकही आहेत, जे अशा प्रकारची कामे करतात.”
“हे योग्य वाटले नसते, जर मी ट्वीटमध्ये नाव सांगितले असते. ज्याने हे केले त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. मी ते ट्वीट यासाठी केले की, दुसऱ्या खेळाडूंवर अशी वेळ येऊ नये. मला फक्त एवढेच सांगायचे होते की, जे केले गेले, तर चुकिचे आहे आणि पुन्हा कुणीच असे करू नये. ” असे साहा पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, हे ट्वीट करण्यापूर्वी साहाने दिलेली मुलाखत खास चर्चेचा विषय ठरली होती. मुलाखतीत त्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि संघाचे मुख्य प्रशिक्षर राहुल द्रविड यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा खुलासा केला. या मुलाखतीनंतरच साहावर या पत्रकाराकडून मुलाखत देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या –
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ व्यवस्थापनात मोठा बदल; ‘त्या’ व्यक्तीच्या जागी…
भारतीय संघाकडून गोलंदाजी प्रशिक्षक बदलण्याची मागणी; ‘या’ दिग्गजाचे सुचविले नाव