मागील काही दिवसांपासून क्रिकेटपटू निवृत्ती घेत असल्याच्या बातम्या येत आहेत. आता यामध्ये आणखी एका क्रिकेटपटूची भर पडली आहे. भारताच्या 19 वर्षांखालील पुरुष संघाचा भाग राहिलेला आणि आयपीएलमध्ये मुंबई तसेच बेंगलोर संघाकडून खेळणाऱ्या एका खेळाडूने निवृत्ती घेतली आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून आसामचा वेगवान गोलंदाज अबू नेचिम याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. 34 वर्षीय गोलंदाजाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.
अबू नेचिमने घेतली निवृत्ती
अबू नेचिम (Abu Nechim) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, “मी क्रिकेटपासून दूर जात असून सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रकारातून आणि स्तरातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा करण्यासाठी आलो आहे. मी क्रिकेटवर खूप प्रेम करतो. मला संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयला धन्यवाद देऊ इच्छितो.”
https://www.instagram.com/p/CoMp8wxvuIc/?hl=en
अबूने 17 वर्षांच्या वयात आसामसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने भारताच्या 19 वर्षांखालील संघातही स्थान मिळवले. त्याने 2006मध्ये पुरुषांच्या 19 वर्षांखालील उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध स्विंग गोलंदाजीच्या जोरावर शानदार काामगिरी केली होती. त्यावेळी त्याने 14 धावा देत 4 विकेट्स नावावर केल्या होत्या.
तो म्हणाला होता की, “आयपीएलच्या दोन फ्रँचायझी मुंबई इंडियन्स आणि आरसीबीलाही त्यांच्या पाठिंब्यासाठी धन्यवाद देऊ इच्छितो. हा खेळ खेळणे आणि मागील 23 वर्षात आलेल्या प्रत्येक चढ-उतारातून शिकण्याचा प्रवास खूपच अद्भूत राहिला आहे.”
अबू याने 2010पासून 4 हंगाम मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून खेळले. तो 2013च्या आयपीएल विजेत्या मुंबई संघाचाही भाग राहिला होता. तो आयपीएल 2014-2016 दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडून खेळला होता. त्याने 17 आयपीएल सामने खेळले आहेत. त्यात त्याने 8.69च्या इकॉनॉमी रेटने 12 विकेट्स घेतल्या आहेत. या स्पर्धेचा भाग बनणारा तो आसामचा पहिला खेळाडू होता.
त्याच्या देशांतर्गत कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने 68 प्रथम श्रेणी सामन्यात 172 विकेट्स, 61 अ दर्जाच्या सामन्यात 65 विकेट्स आणि 80 टी20 सामन्यात 78 विकेट्स घेतल्या आहेत. (assam pacer abu nechim announces retirement from all forms of cricket read more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीआधी समजली ऑस्ट्रेलियाची मोठी कमजोरी, दिग्गजाकडून माहितीचा खुलासा
पाकिस्तानी क्रिकेटरला झालंय तरी काय? विराटनंतर ‘या’ भारतीयाविषयी गरळ ओकत म्हणाला, ‘आमच्याकडे चिक्कार…’