गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) मंगळवारी एटीके मोहन बागान आणि चेन्नईयीन एफसी या तुल्यबळ संघांमधील लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याने चेन्नईयीनच्या अथक चाली रोखल्या. या बरोबरीसह एटीके मोहन बागानने गुणतक्त्यात आघाडी घेतली.
एटीकेएमबीचाी 8 सामन्यांतील ही दुसरीच बरोबरी असून पाच विजय व एकमेव पराभव अशा कामगिरीसह त्यांचे सर्वाधिक 17 गुण झाले. मुंबई सिटी एफसी 7 सामन्यांतून 16 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर गेले. या लढतीपूर्वी एटीकेएमबी आणि मुंबई सिटी यांचे समान 16 गुण होते, पण मुंबई सिटीचा गोलफरक सरस होता. आता एटीकेएमबीने आघाडी घेतली असली तरी त्यांचा एक सामना जास्त झाला आहे.
चेन्नईयीनने 8 सामन्यांत चौथी बरोबरी पत्करली असून दोन विजय व दोन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे दहा गुण झाले. त्यांचे सातवे स्थान कायम राहिले. जमशेदपूर एफसी 9 सामन्यांतून 13 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या क्रमांकावर बेंगळुरू एफसी असून 8 सामन्यांतून त्यांचे 12 गुण आहेत.
पहिल्याच मिनिटाला एटीकेएमबीला कॉर्नर मिळाला. मध्यरक्षक एदू गार्सियाने बॉक्समध्ये मारलेल्या चेंडूवर स्ट्रायकर मानवीरने हेडिंग केले, पण प्रतिस्पर्ध्यांच्या दडपणामुळे त्याने हेडिंग केलेला चेंडू बाहेर गेला. पाचव्या मिनिटाला चेन्नईयीनने उल्लेखनीय प्रयत्न केला. उजवीकडून मध्यरक्षक मेमो मौराने मैदानालगत क्रॉस शॉट मारला. मध्य फळीतील रॅफेल क्रिव्हेलारोने आघाडी फळीतील जेकब सिल्व्हेस्टर याच्या साथीत चाल पुढे नेली. क्रिव्हेलारोने किक मारली, पण एटीकेएमबीचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याने भक्कम बचाव केला.
आठव्या मिनिटाला क्रिव्हेलारोने बॉक्सलगत चेंडू मिळताच डावीकडील लालियनझुला छांगटे याला पास दिला, पण छांगटेचा फटका स्वैर होता. 11व्या मिनिटाला गार्सियाने फ्री किकवर रॉय19व्या मिनिटाला कृष्णाने कौशल्याने चेंडूवर ताबा मिळवत आगेकूच केली. त्याने उजवीकडे मानवीरला पास दिला. मानवीरने पुन्हा कृष्णाकडे चेंडू सोपवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या खराब क्रॉस शॉटमुळे साबिया चेंडू मध्ये सहज अडवू शकला.
चेन्नईयीनला पहिला कॉर्नर 15व्या मिनिटाला मिळाला. क्रिव्हेलारोने उजवीकडून अप्रतिम चेंडू मारला. त्यानंतर अनिरुध थापाने प्रयत्न केला, पण मानवीरने एटीकेएमबीचे क्षेत्र सुरक्षित राखले. 28व्या मिनिटाला गार्सियाने उजवीकडे चेंडू मिळताच बॉक्समध्ये क्रॉस शॉट मारला. डेव्हिड विल्यम्सने पेनल्टी क्षेत्रात धाव घेत फटका मारला, पण चेन्नईयीनचा बचावपटू रिगन सिंग याच्या बचावामुळे तो फिनिशींग करू शकला नाही.
दुसऱ्या सत्रात 50व्या मिनिटाला चेन्नईयीनचा गोलरक्षक विशाल कैथ याने डावीकडून लांबवर चेंडू मारत छांगटेला वाव दिला. छांगटेने प्रयत्न केला, पण एटीकेएमबीचा गोलरक्षक अरींदम भट्टाचार्य याने झेपावत डाव्या हाताच्या बोटांनी चेंडू बाहेर घालवला. 56व्या मिनिटाला मेमो मौरा, तर 59व्या मिनिटाला जेकब सिल्व्हेस्टर यांचे प्रयत्न भट्टाचार्यने पोल ठरवले. मग 66व्या मिनिटाला मेमोने फ्री किकवर केलेला प्रयत्नही अरींदमचा बचाव भेदू शकला नाही.
80व्या मिनिटाला रिगनने उजवीकडून प्रयत्न केला, पण अरींदमने झेप टाकत चेंडू बाहेर घालवला. त्यामुळे मिळालेला कॉर्नर रिंगनने घेतला. त्याने मारलेल्या चेंडूवर साबियाने हेडिंग केले, पण अरींदमचा बचाव अभेद्य राहिला. 86व्या मिनिटाला शुभाशिष बोसने डावीकडून कृष्णाला पास दिला. कृष्णाने हेडिंग केले, पण तो फिनिशींग करू शकला नाही.
संबधित बातम्या:
– आयएसएल २०२० : चेन्नईयीन एफसीसमोर एटीके मोहन बागान संघाचे आव्हान
– आयएसएल २०२० : बेंगळुरूला धक्का देत जमशेदपूर तिसऱ्या स्थानी; स्टीफन इझेचा निर्णायक गोल
– आयएसएल २०२०: हैदराबादला हरवून ब्लास्टर्सचा पहिलाच विजय