आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेपूर्वी आजी-माजी क्रिकेटपटूंनी अनेक भविष्यवाणी करत क्रिकेटप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. या यादीत आता आणखी एका खेळाडूचे नाव जोडले गेले आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिचेल मार्श याने विश्वचषक अंतिम सामन्याविषयी भविष्यवाणी केली आहे. मार्शनुसार, असे दोनच संघ आहेत, ज्यांच्यात अंतिम सामना खेळला जाईल. चला तर, त्याविषयी जाणून घेऊयात…
काय म्हणाला मार्श?
मिचेल मार्श (Mitchell Marsh) याने ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) याच्यासोबत बोलताना विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेविषयी आपले मत मांडले. मार्श याने भविष्यवाणी करत म्हटले की, “प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर मला वाटते की, यावेळी विश्वचषकाचा अंतिम सामना पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळला जाईल.” आता मार्शच्या या भविष्यवाणीची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे. चाहते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया मांडत आहेत.
खरं तर, वनडे विश्वचषक स्पर्धेला भारतात 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमने-सामने असणार आहेत. अखेरचा विश्वचषक जिंकणाऱ्या संघांविषयी बोलायचं झालं, तर भारतीय संघाने अखेरचा वनडे विश्वचषक 2011मध्ये जिंकला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 2015मध्ये अखेरचा विश्वचषक जिंकला होता.
दुसरीकडे, पाकिस्तान संघाविषयी बोलायचं झालं, तर संघाने इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली 1992 मध्ये विश्वचषक जिंकला होता. तसेच, 2019चा विश्वचषक इंग्लंडने उंचावला होता. आता मिचेल मार्शची भविष्यवाणी खरी ठरते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
वनडे विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), सीन ऍबॉट, ऍश्टन एगर, ऍलेक्स कॅरे, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, ऍडम झम्पा (aussie cricketer mitchell marsh prediction on odi world cup final this two teams will play the world cup final in india)
हेही वाचाच-
SL vs BAN Toss: सुपर फोरमधील दुसऱ्या सामन्यात ‘हा’ संघ ‘टॉस का बॉस’, एक बदलासह बांगलादेश उतरणार मैदानात
मोठी बातमी! भारताच्या आणखी एका खेळाडूने धरली परदेशी संघाची वाट, वाचा कोण आहे तो?






