---Advertisement---

एकाच दिवसात त्या संघाचा क्रिकेट, टेनिस , फूुटबाॅल आणि रग्बीमध्ये पराभव

On: रविवार, जून 17, 2018 5:11 PM
---Advertisement---

मुंबई | शनिवार, दिनांक १६ जून रोजी आॅस्ट्रेलिया देशाला तब्बल ४ खेळांत मोठ्या स्पर्धांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. त्यात क्रिकेट, टेनिस, फूटबाॅल, रग्बी आणि टेनिस या खेळांचा समावेश आहे.

काल क्रिकेटमध्ये आॅस्ट्रेलिया संघाला पारंपारिक प्रतिस्पर्धी इंंग्लंडविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात ३८ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचा हा ५ सामन्यांच्या मालिकेतील सलग दुसरा पराभव होता.

फूटबाॅल विश्वचषकात ह्या संघाला क गटात फ्रांसकडून २-१ असा पराभव स्विकारावा लागला. फ्रांसकडून फॉरवर्ड एंटोनी स्कॉझमनने 58व्या मिनीटाला आणि पॉल पोग्बाने 81व्या मिनीटाला गोल केला. ऑस्ट्रेलियाकडून 33 वर्षीय मिडफिल्डर माईल जेडिनकने या 62व्या मिनीटाला गोल केला. या विश्वचषकातील त्यांचा पहिलाच सामना होता. 

टेनिसमध्ये स्टुटगार्ड ओपनमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राॅजर फेडररने आॅस्ट्रेलियाच्या निक क्रिग्रिओसला ६-७, ६-२, ७-६ असा पराभव केला. याबरोबर राॅजर फेडरर एटीपी क्रमवारीत पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे.

रग्बीमध्येदेखील या संघाला घरच्याच मैदानावर अायर्लंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात २६-२१ अशा पराभवला या संघाला सामोरे जावे लागले.

क्रिकेटवरील भारतीय क्रिकेटचे शापीत शिलेदार” लेखमालिकेतील खास लेख:

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १० – विस्मृतीत गेलेला अजय रात्रा

वाचा-

मुंबई क्रिकेट सफरनामा भाग ३- मुंबई क्रिकेट कार्निवल- पंचरंगी स्पर्धा

महत्त्वाच्या बातम्या:

हा मोठा खेळाडू म्हणतो अफगाणिस्तानला अजून वेळ दिला पाहिजे!

अनुष्काच्या स्वच्छता मोहिमेला विराट कोहलीचा पाठिंबा

–लोढा समितीची पहिली विकेट; मुंबईकर अजित अागरकर बाद!

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment