विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 27व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड आमने-सामने आहेत. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर डेविड वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांनी विस्फोटक फलंदाजी करत पॉवरप्लेमध्ये विश्वचषकातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या उभारली.
ऑस्ट्रेलियाचा विक्रम
ऑस्ट्रेलियाकडून यावेळी डेविड वॉर्नर (David Warner) आणि ट्रेविस हेड (Travis Head) यांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे, त्यांनी पॉवरप्लेमध्ये म्हणजेच पहिल्या 10 षटकात विश्वचषकातील दुसरी सर्वाधिक 118 धावसंख्या उभारली. याआधी वेस्ट इंडिजने कॅनडाविरुद्ध 2003मध्ये 119 धावा केल्या होत्या. अशात ऑस्ट्रेलियाच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. 1999 पासून विश्वचषकात पॉवरप्लेमध्ये वेगवान 100 धावा करणारा ऑस्ट्रेलिया दुसरा संघ ठरला. त्यांनी 8.5 षटकातच 100 धावांचा टप्पा गाठला.
AUSTRALIA 118/0 AFTER POWERPLAY….!!!
Warner and Head smashed 10 sixes in 10 overs – proper carnage! pic.twitter.com/cO0CRWSyRL
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 28, 2023
खरं तर, विश्वचषकात पॉवरप्लेमध्ये सर्वात वेगवान 100 धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. त्यांनी 2015मध्ये वेलिंग्टन येथे खेळताना इंग्लंडविरुद्ध अवघ्या 6.4 षटकात 100 धावांचा टप्पा गाठला होत.
वॉर्नर-हेडचा झंझावात
ऑस्ट्रेलियाला ही धावसंख्या उभारण्यात वॉर्नर आणि हेडने मोलाचा वाटा उचलला. त्यांनी एकही विकेट न गमावता टिच्चून फलंदाजी केली. तसेच, दोघांनीही आपली अर्धशतके केली. 10 षटकाचा खेळ संपल्यानंतर वॉर्नरने 37 चेंडूत 65 धावा केल्या. यामध्ये 5 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. तसेच, ट्रेविस हेड याने 25 चेंडूत 50 धावा केल्या. त्याच्या खेळीत 4 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता.
विश्वचषकात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारे संघ
वनडे विश्वचषकात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांमध्ये वेस्ट इंडिज पहिल्या स्थानी असून त्यांनी 2003च्या विश्वचषकात सेंच्युरियन येथे कॅनडाविरुद्ध 1 बाद 119 धावा केलेल्या. तसेच, यादीत दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलिया असून त्यांनी विश्वचषक 2023मध्ये धरमशाला येथे न्यूझीलंडविरुद्ध 118 धावा केल्या. तिसऱ्या स्थानी न्यूझीलंड असून त्यांनी 2015च्या विश्वचषकात वेलिंग्टन येथे इंग्लंडविरुद्ध 2 बाद 116 धावा केल्या होत्या. तसेच, यादीत संयुक्तरीत्या चौथ्या स्थानी भारत आणि श्रीलंका आहेत. भारताने दिल्लीत याच विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध पॉवरप्लेमध्ये 94 धावा केल्या होत्या, तर श्रीलंकेने दिल्लीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 94 धावा केल्या होत्या. (Australia smashed the 2nd highest Powerplay score in World Cup history read here)
विश्वचषकात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारे संघ
119/1 – वेस्ट इंडिज विरुद्ध कॅनडा, सेंच्युरियन- 2003 विश्वचषक
118/0 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, धरमशाला, 2023 विश्वचषक*
116/2 – न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, वेलिंग्टन- 2015 विश्वचषक
94/0- भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली- 2023 विश्वचषक
94/2- श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दिल्ली- 2023 विश्वचषक
हेही वाचा-
कोहलीबद्दल माजी खेळाडूची मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘ही भूक केवळ…’
बिग ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी घोषित केला संघ, कर्णधार कोण? वाचा