---Advertisement---

विंडिज आणि बांग्लादेश दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर, अजून एका भावंडांच्या जोडीचीही निवड

On: मंगळवार, जून 8, 2021 10:20 PM
---Advertisement---

क्रिकेट विश्वामध्ये भावंडांची जोडी खेळत असलेले जगातील अनेक देशांमध्ये दिसून येत आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाकडून देखील आणखीन एका भावंडांची जोडी लवकरच खेळताना दिसणार आहे. वेस्टइंडीज आणि बांगलादेश दौऱ्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नुकतीच 29 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या अगोदर या यादीत फक्त 23 खेळाडूंचा समावेश होता. परंतु नंतर आणखीन सहा खेळाडूंचा संघामध्ये समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया संघाला वेस्टइंडीज दौऱ्यावर पाच टी20 सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. त्याच बरोबर बांगलादेश दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघाला पाच टी20 सामने खेळायचे आहेत. यावर्षी ऑस्ट्रेलिया संघाला ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार्‍या टी20 विश्वचषकच्या दृष्टीने या दोन्ही मालिका खूप महत्वाच्या आहेत.

या जाहीर केलेल्या यादीत अष्टपैलू खेळाडू डॅन ख्रिस्टियानचा समावेश आहे. याच्या व्यतिरिक्त बेन मैक्डरमॉट, कैमरून ग्रीन, एस्टन टर्नर, वेस एगर आणि नॅथन एलिस यांचाही समावेश आहे. वेस एगर डावखुरा फिरकीपटू एस्टन एगर याचा छोटा भाऊ आहे. वेस एगर वेगवान गोलंदाज आहे. वेस एगरला आतापर्यंत आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र येत्या दौऱ्यात त्याने पदार्पण केल्यास ऑस्ट्रेलियाकडून अजून एक भावंडांची जोडी खेळतांना दिसून येईल. याच्या अगोदर ऑस्ट्रेलिया संघामध्ये इयान चॅपल-ग्रेग चॅपल, मार्क वॉ-स्टीव वॉ आणि मिचेल मार्श-शॉन मार्श या भावंडांच्या जोड्या मैदानावर उतरल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाच्या 29 सदस्यांच्या संघांमध्ये अजूनही स्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स यांना स्थान मिळू शकते. अगोदर असे वृत्त समोर आले होते की त्यांनी आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यास नकार दिला होता. निवडकर्ते ट्रेवर होंस यांनी सांगितले की, “बायो बबल आणि सद्य परिस्थिती पाहता आणखी सहा खेळाडूंचा संघात समावेश करून घेतलेला आहे. खेळाडू आणि स्पोर्ट्स स्टाफ यांची सुरक्षा आमचे प्रथम कर्तव्य आहे.” ऑस्ट्रेलिया संघाला जुलै आणि ऑगस्टमध्ये वेस्टइंडीज आणि बांगलादेशमध्ये मालिका खेळायची आहे.

भारतीय वंशाच्या खेळाडूचाही समावेश 
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघामध्ये युवा खेळाडू तनवीर संघा याचाही समावेश आहे. तनवीर संघा मूळ भारतीय असून ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. त्याचे वडील जालंधर येथे राहत होते. ते तिथून ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाले. तनवीर सध्या ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा २९ सदस्यीय संघ- एरोन फिंच, डेविड वॉर्नर, डिआर्ची शॉर्ट, स्टीव स्मिथ, जोश फिलिप, बेन मॅक्डरमॉट, मॅथ्यू वेड, एलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, एस्टन टर्नर, मार्कस स्टोइनिस, कॅमरून ग्रीन, मोइजेस हेनरिक्स, मिचेल मार्श, डॅन ख्रिस्टियन, एस्टन एगर, एडम जंपा, मिचेल स्विपसन, तनवीर संघा, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जेसन बेहरनडोर्फ, जोश  हेजलवुड, रिले मेरिडिथ, झाय रिचडर्सन, केन रिचर्डसन, एंड्रयू टाय, वेस एगर, नॅथन एलिस.

महत्वाच्या बातम्या:

या कारणामुळे कोहली ठरतो जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज, राशिद खानने सांगितली खुबी

विराट-रोहित नाही, तर कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत या खेळाडूंची भूमिका निर्णायक

इंग्लिश क्रिकेटमध्ये वादळ! आणखी एका आंतरराष्ट्रीय खेळाडूची होणार वर्णद्वेषी टिप्पणीसाठी चौकशी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---