क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका आणि भारत दौऱ्यासह आगामी विश्वचषकासाठी आपल्या वनडे संघाची घोषणा केली. सोमवारी (7 जुलै) या 18 सदस्यीय संघाची घोषणा होताच काही खेळाडूंबाबत आश्चर्य व्यक्त केले जाऊ लागले. 5 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाला विश्वचषकातील आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी यजमान भारतासोबत खेळायचा आहे.
वनडे विश्वचषकासाठी (ICC ODI Wolrd Cup 2023) संघ घोषित करण्यासाठी अखेरची तारीख 28 सप्टेंबर आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियन संघाकडे देखील अजून बऱ्याच दिवसांचा वेळ आहे. यादरम्यान खेळाडूंचे प्रदर्शन पाहून ते आपल्या संघात आवश्यक बदल करू शकतात. चाहत्यांना सर्वात जास्त आश्चर्य याचे वाटले की, मार्नस लॅबुशेन (Marnus Labuschagne) याला या विश्वचषक संघात निवडले गेले नाहीये. त्याऐवजी अनकॅप्ट खेळाडू तनवीर संघा आणि अष्टपैलू एरॉन हार्डी यांना संधी दिली गेली आहे.
ऑस्ट्रेलियन संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा 30 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. याठिकाणी उभय संघात तीन सामन्यांची टी-20 आणि पाच सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. ग्लेन मॅक्सवेल या टी-20 मालिकेचा भाग नसेल. तसेच दुखापतग्रस्त पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्या जागी मिचेल मार्श (Mitchell Marsh) या संघाचे नेतृत्व करेल. त्यानंतरत ऑस्ट्रेलियन संघ भारतात येईल. विश्वचषकापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाईल. मार्नस लॅबुशेन (Marnus Labuschagne) याला वनडे संघातून वगळण्यात आल्याने वनडे विश्वचषकात तो खेळण्याच्या आशा देखील मावळल्या आहेत. सोबतच याबाबत चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. (Australia’s squad for the 2023 World Cup and India series.)
दक्षिण आफ्रिका आणि भारत दौऱ्यासह विश्वचषक 2023 साठी ऑस्ट्रेलिनय संघ –
पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ऍबॉट, ऍश्टन अगर, ऍलेक्स कॅरे, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, ऍरॉन हार्डी, जोश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस , डेव्हिड वॉर्नर, ऍडम झाम्पा.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ –
ऑस्ट्रेलिया टी-२० संघ: मिचेल मार्श (कर्णधार), शॉन ऍबॉट, जेसन बेहरनडॉर्फ, टिम डेव्हिड, नेथन एलिस, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, ऍडम झाम्पा.
महत्वाच्या बातम्या –
पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेणाऱ्या हार्दिकने ‘या’ खेळाडूंवर फोडलं पराभवाच खापर! वाचा काय म्हणाला कर्णधार
पूरन-अकिलचा टीम इंडियावर प्रहार! हार्दिक सेनेचा सलग दुसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव