क्रिकेटच्या मैदानावर अनेक असे गोलंदाज होऊन गेले ज्यांनी आपल्या स्विंग गोलंदाजीने सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडले होते. यात वसीम अक्रम हे नाव सर्वोच स्थानी आहे. तसेच मॉडर्न डे क्रिकेटमध्ये ही असे अनेक गोलंदाज आहेत. जे आपल्या वेगवान आणि स्विंग गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. यामध्ये महिला क्रिकेटपटूंचा देखील समावेश आहे. अशातच एका महिला क्रिकेटपटूच्या स्विंग गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आयर्लंड आणि स्कॉटलंड यांच्यात झालेल्या टी -२० सामन्यात महिला क्रिकेटपटूने आपल्या स्विंग गोलंदाजीने फलंदाजी करत असलेल्या खेळाडूला बाद केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. तर झाले असे की,पहिल्या टी -२० सामन्यात, आयर्लंड संघाची गोलंदाज एवा कॅनिंग हीने हवेत स्विंग होणारा चेंडू टाकला जो स्कॉटलंड संघाची सलामी फलंदाज बेकी ग्लेन हिला कळालच नाही, तिची बॅट चेंडू जवळ येईपर्यंत, चेंडू त्रिफळा गुल करत निघून गेला होता. हा नजारा पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
Becky Glen becomes Ava Canning's maiden international wicket ☝️#IREvSCO pic.twitter.com/7haEzBSDOJ
— ICC (@ICC) May 24, 2021
मुख्य बाब म्हणजे, एवाची ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलीच विकेट होती. तिने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी केली. यात तिने १७ धावा देत १ विकेट घेतली. तसेच आयर्लंड संघाची गोलंदाज केलेस्टे राक हीने ३ षटके गोलंदाजी करत ३ गडी बाद केले होते. तसेच लॉरा डेलानी हीने २ गडी बाद केले होते. स्कॉटलंड संघाला २० षटकात ९ गडी बाद ८७ धावा बाद करण्यात यश आले होते. प्रत्युत्तरात आयर्लंड संघाला अवघ्या ७९ धावा करता आल्या होत्या. आयर्लंड संघाकडून कैटी मैक्गिल हीने ३ गडी बाद केले होते तर कैथरीन फ्रैसर हिला देखील २ गडी बाद करण्यात यश आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंकेला पराभूत करत वनडे सुपर लीगच्या क्रमवारीत बांगलादेश अव्वल; तर भारतीय संघ ‘या’ स्थानी
आठवणीतील सामना: २२ वर्षापूर्वी गांगुली आणि द्रविडने रचला होता हा ‘दादा’ विक्रम