मुंबई। सोमवारी(६ डिसेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने ३७२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने २ सामन्यांची कसोटी मालिका १-० अशा फरकाने जिंकली. दरम्यान, या मालिकेत भारताचे दोन आणि न्यूझीलंडचे दोन असे चार खेळाडू त्यांच्या कामगिरीबरोबरच त्यांच्या नावांमुळेही बरेच चर्चेत आले. आता या चार खेळाडूंचा एकत्रित फोटो देखील प्रचंड व्हायरल होत आहे.
हे चार खेळाडू म्हणजे, भारताचे अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा, तर न्यूझीलंडचे एजाज पटेल आणि रचिन रविंद्र (Ravindra Jadeja, Ajaz Patel, Rachin Ravindra, Axar Patel).
फोटो होतोय व्हायरल
अक्षर, जडेजा, एजाज आणि रचिन यांचे मुंबई कसोटीनंतरचे फोटो बीसीसीआय आणि आयसीसी यांनी शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दिसते की हे चारही खेळाडू पाठमोरे उभे राहिले आहेत. यामध्ये डावीकडून अक्षर, एजाज, रचिन आणि जडेजा असे उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या जर्सीवरील नावांमुळे अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा अशी २ भारतीय संघातील खेळाडूंची नावं तयार झाली.
Picture perfect 👌
📸 @ashwinravi99 pic.twitter.com/av8LZdSAcZ
— ICC (@ICC) December 6, 2021
अर्थात, अक्षर पटेलच्या जर्सीवर ‘अक्षर’ हे त्याचे पहिले नाव २० क्रमांकासह आहे, तर एजाजच्या जर्सी २४ क्रमांकाची असून त्यावर त्याचे अडनाव ‘पटेल’ असं छापलेले आहे. तसेच रचिन आणि जडेजा यांचा जर्सी क्रमांक सारखाच आहे, हे दोघेही ८ क्रमांकाची जर्सी घालतात. मात्र, रचिनच्या जर्सीवर ‘रविंद्र’ लिहिलेले आहे, तर जडेजा त्याचे अडनाव जर्सीवर लिहितो. त्यामुळे जेव्हा हे चौघे पाठमोरे उभे राहिले, तेव्हा अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा अशी नावं तयार झाली.
In Sync! ☺️
How's that for a quartet! 🇮🇳 🇳🇿#INDvNZ #TeamIndia @Paytm pic.twitter.com/eKqDIIlx7m
— BCCI (@BCCI) December 6, 2021
रचिन आणि एजाजचे भारताशी नाते
खरंतर रचिन आणि एजाज हे दोघेही भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. रचिन हा न्यूझीलंडमध्ये जन्मला असला, तरी त्याचे पालक भारतीय वंशाचे आहेत. विशेष म्हणजे त्याचे ‘रचिन’ हे नाव भारताचे दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
त्याचबरोबर एजाजबद्दल बोलायचे झाल्यास त्याचा जन्म मुंबईत झाला असून तो वयाच्या ८ व्या वर्षी त्याच्या पालकांसह न्यूझीलंडला स्थायिक झाला. त्यामुळे त्याचे सर्व शिक्षण न्यूझीलंडमध्येच झाले असून त्याने क्रिकेटचे धडेही न्यूझीलंडमध्येच गिरवले.
महत्त्वाच्या बातम्या –
“भाई किस लाईन मे आ गये आप”, पुजाराने षटकार मारताच सोशल मीडियावर पडला मीम्सचा पाऊस
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?
लाईव्ह सामन्यात जेव्हा विराट कोहलीने घेतली कॅमेरामनची फिरकी, व्हिडिओ भन्नाट व्हायरल